आर्मी स्कूलला शिक्षक दिनासह अभिष्टचिंतन सोहळा साजरा

0
37

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक दिन आणि नानासाहेब विजय नवल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पी.सी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम.कोळी होते.

प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, ज्येष्ठ शिक्षक व्ही.जी. बोरसे होते. प्रमुख वक्ते म्हणून अनिल पाटील मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यार्थी शिक्षक म्हणून भूमिका केलेल्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळालेल्या व्ही. डी.पाटील, संजय पाटील या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षकांची भूमिका केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात ज्ञानेश्वर पाटील या विद्यार्थ्याने प्राचार्यांची भूमिका पार पाडली. प्रमुख वक्ते अनिल पाटील यांनी शिक्षण महर्षी नानासाहेब विजय नवल पाटील यांच्या कार्यावर प्रकाश ज्योत टाकला.

शाळेच्या योगदानात ‘नानासाहेबांचा’ पाठिंबा

सांस्कृतिक प्रमुख शरद पाटील यांनीही नानासाहेब विजय नवल पाटील यांचा लेखाजोखा मांडून अभिष्टचिंतन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.एम. कोळी यांनी नानासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन शाळेच्या योगदानात नानासाहेबांचा पाठिंबाविषयी आभार मानले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचनाही केल्या. सूत्रसंचालन ९ वीचा विद्यार्थी राज खैरनार, नरेंद्र राठोड याने तर आभार शैलेश माळी याने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here