साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यात 2 आमदार आणि 3 खासदार लाभलेले आहेत. तरीपण तालुक्याच्या विकास हा कासावापेक्षा हळू होत आहे. रस्ते म्हटलं म्हणजे एखाद्याच ठिकाणी रस्ता सापडावा असा. नाहीतर सगळीकडे फक्त गाराच गारा आणि चिखलाचे साम्राज्य.
नुकतेच विद्यमान आमदार श्री उदयसिंह राजपूत यांनी मंजूर केलेला 5 कोटी रुपयांचा रस्ता सुद्धा राहिला तो कागदावरच.
नागरिक आता बोलतात की,काय तो रस्ता,काय तो सोयगाव तालुका आणि काय ते लोकप्रतिनिधी. सगळं एकदम ok मध्ये आहे. सरकारी दवाखाना बघितला तर तिचं परिस्तिथी,पशुवैद्यकीय दवाखाना तर विचारूच नका. तिथे पत्ते खेळणाऱ्या गडींचाच डाव. आणि इतर सर्व सुविधा फक्त कागदोपत्री. लोकप्रतिनधींनी थोडंसं तर गावाच्या विकासावर भर द्यावा आणि लोकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात.