शासकीय रुग्णालयात चार महिन्यांच्या “अरबाज”ने मृत्यूलाही परतविले !

0
55

साईमत जळगाव प्रतिनिधी

न्यूमोनिया आजारामुळे श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तसेच किडनीला इजा झालेली असताना व्हेन्टिलेटरच्या सहाय्याने व औषधोपचाराने चार वर्षीय “अरबाज”ने मृत्यूलाही परतवून लावल्याची घटना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली आहे. या बालकावर यशस्वी उपचार करणाऱ्या बालरोग व चिकित्साशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी कौतुक केले आहे.

पाचोरा शहरातील अबुजार शेख अरबाज या ४ महिने वयाच्या बालकाला त्याच्या कुटुंबीयांनी न्युमोनिया झाला म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी त्याला श्वास घ्यायलाही त्रास होता. त्याला व्हेन्टिलेटरच्या सहाय्याने ३ दिवस उपचार करण्यात आले. त्यातून स्थिर झाल्यावरही, आजाराचे दुष्परिणाम झाल्यामुळे किडनी व्यवस्थित काम करत नव्हती. त्यावेळी त्याच्यावर बालरोग विभागाच्या पथकाने औषधोपचार सुरूच ठेवले होते. अखेर १६ दिवसांनी त्याला पूर्ण बरे करण्यात यश मिळाले. त्यानंतर त्याला रुग्णालयातून निरोप देण्यात आला. यावेळी बालकाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले.

बालकावर उपचार करण्याकामी विभागप्रमुख डॉ. सत्यवान मोरे, सहयोगी प्रा. डॉ. गजानन सुरेवाड, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. गिरीश राणे, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. सुरसिंग पावरा, डॉ. मयूर घुगे, डॉ. अनिरुद्ध कारंडे यांच्यासह लहान मुलांच्या अतिदक्षता विभागाच्या इन्चार्ज परिचारिका श्रद्धा सपकाळे, कक्ष ४ च्या इन्चार्ज परिचारिका संगीता शिंदे आदींनी परिश्रम घेतले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here