समाजातर्फे फटाके फोडून एकमेकांना पेढे देऊन आनंद साजरा
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
लाडशाखीय वाणी समाजासाठी राज्य सरकारने ‘लाडशाखीय वाणी समाज सोळा कुलस्वामिनी महामंडळ’ ह्या नावाने राज्य सरकारच्या गुरुवारी मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याबद्दल येथील समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाणी मंगल कार्यालयासमोर फटाके फोडून एकमेकांना पेढे देऊन आनंद साजरा केला.
चाळीसगाव येथे गेल्या महिन्यात अल्प कालावधीत आयोजित केलेल्या “लाडशाखीय वाणी समाजाचा महामेळाव्याचे” हे यश आहे. तसेच समाजाची एकजूट काय असते, हे सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींच्या लक्षात आले असे मेळाव्याचे आयोजक पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश पाटे, वाणी समाजाचे सचिव सी. सी. वाणी, पत्रकार भिकन वाणी, युवा कार्यकर्ते अमोल नानकर यांनी सांगितले. याप्रसंगी मेहुणबारे येथील माजी सरपंच राजेंद्र अमृतकर, सूर्यकांत शिनकर, डॉ.भोकरे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
समाजाचे अध्यक्ष शरद मोराणकर, भाजपचे युवा मोर्चाचे राज्य सरचिटणीस भावेश कोठावदे, संदेश येवले, बाजार समितीचे संचालक निलेश वाणी हे मुंबई येथे गेल्या तीन दिवसांपासून समाजासाठी महामंडळ मिळविण्यासाठी तळ ठोकून होते. याप्रसंगी आ.मंगेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
समाजाचे नागरिक आले एकत्र
महामेळाव्याचे आयोजक सतीश पाटे, समाजाचे अध्यक्ष शरद मोराणकर, सचिव सी. सी. वाणी, अशोक बागड, संदेश येवले, राजेंद्र कोतकर, हिरालाल शिनकर, अमोल नानकर, चंद्रकांत पाखले, श्री.धामणे आदी कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या आवाहनानुसार समाजाचे नागरिक वाणी समाज मंगल कार्यालयात एकत्र आले होते.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी गुरुदत्त पतपेढीचे चेअरमन दिनकर पाखले, भाजपचे शहर उपाध्यक्ष डॉ. महेश वाणी, समाजाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष बी. एम. मालपुरे, मेडिकल असोसिएशनचे योगेश भोकरे, महेश येवले, डी. जी.येवले, तुषार शिनकर, प्रा. दगडू राणे, प्रा. संतोष मालपुरे, गणेश बागड, बी. एम. मालपुरे, प्रा. ए. डी. येवले, प्रा. पी. डी. वाणी, प्रा.बी. आर. येवले आदी समाज बांधव उपस्थित होते.