साईमत/न्यूज नेटवर्क । मुक्ताईनगर ।
येथील अमृत २.० अभियान अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या वाढीव किमतीस मान्यता तसेच बोदवड येथील दोन्ही पाणीपुरवठा योजनांची आचारसंहितेनंतर निविदा निघणार असल्याची माहिती आ.चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. निविदा प्रक्रियेचे २१ दिवस कमी करावेत, यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या महिन्याभरात योजनांच्या कामांना सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना शिंदे गट विधानसभेचे प्रमुख सुनील पाटील, आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी उपस्थित होते.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पास ६ मार्च २०२३ रोजी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ३२ कोटी १४ लाख रुपयाच्या प्रशासकीय मान्यता दिलेली होती. योजनेत तांत्रिक बाबी नसल्याने योजनेला स्थगिती घेण्यात आलेली होती. आता या योजनेत नव्याने पाण्याचे उद्धवाचे ठिकाणी मळ पंप व प्रि सेटलिंग टाकी या योजना नव्याने घेण्यात आलेल्या आहे. आता ही योजना ४६ कोटी रुपयांची असेल. तसेच बोदवड तालुका बोदवड येथील समांतर पाणी योजना व अमृत दोन या दोन्ही योजना सुमारे ७४ कोटीच्या योजना शिक्षक आमदार आचारसंहितेनंतर या दोन्ही योजनांच्या निविदा काढण्यात येतील. महिन्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती आ.चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पूर्णा नदी गाळ युक्त नदी
मुक्ताईनगर शहराला पूर्णा नदीच्या पात्रामधून पाणीपुरवठा होत असतो. पूर्णा नदी ही गाळ युक्त नदी असल्याने पावसाळ्यात मुक्ताईनगर शहराला गढूळ पाणी पुरवठ्याला सामोरे जावे लागते. यासाठी आ.चंद्रकांत पाटील यांनी ६ मार्च २०२३ रोजी नगर विकास विभाग यांच्याकडून मुक्ताईनगर शहराला नव्याने पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. परंतु योजनेत नदीपात्राच्या उद्धवाच्या ठिकाणी मळ पंप व प्री सेटलिंग टाकीचा समावेश नसल्याने योजनेला स्थगिती आणण्यात आली होती.
निविदा निघाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात
नव्याने राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे कक्ष अधिकाऱ्यांनी २४ जून २०२४ रोजी योजनेत मळपंप व प्री सेटलिंग टँक यांचा समावेश करीत ही योजना ४६ कोटींची असणार आहे. येत्या आठ दिवसात योजनेची निविदा निघणार आहे. नंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. मुक्ताईनगर बरोबर बोदवड तालुका बोदवड येथील समांतर पाणी योजना तसेच अमृत दोन ही पाणी योजना शिक्षक आमदार आचारसंहिता संपल्यानंतर बोदवड येथील दोघे पाणीपुरवठा योजना व मुक्ताईनगर येथील नव्याने वाढीव मंजुरी मिळालेल्या योजनांच्या निविदा निघणार असल्याचे आ.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
योजनेत प्री सेटलिंग टँकचा समावेश
पावसाळ्यात पूर्णा नदीला मोठ्या प्रमाणात गाळ येत असल्याने नदीपात्रातून पाणी थेट टाकीमध्ये जात होते. त्यामुळे शहरवासीयांना पावसाळ्यात गढूळ पाण्याचा सामना करावा लागत होता. परंतु आता नवीन प्रकल्पामध्ये प्रि सेटलिंग टँक व मळ पंप घेतल्याने ही समस्या दूर होणार आहे. प्रकल्पात ३.२० लाख लिटर क्षमता असलेली प्री सेटलिंग टाकी असणार आहे.
