रावेर क्षेत्रात २० कोटींच्या ४ रस्त्यांच्या कामांना मंजूरी

0
24

केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याला यश

साईमत/जळगाव/न.प्र.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाने रावेर लोकसभा अंतर्गत बोदवड, रावेर व यावल तालुक्यातील विविध रस्त्यांना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (टप्पा ३) अंतर्गत २२ किमी लांबीच्या ४ रस्ते कामासाठी २० कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी मिळाली आहे, अशी माहिती ना. खडसेंचे स्वीय्य सहाय्यक तुषार राणे यांनी दिली.

या कामांमध्ये यावल तालुकांतर्गत कासारखेडा – किनगाव – चुंचाळे – दहीगांव–कोरपावली ते प्रजिमा १८ (लांबी ८.३४ किमी) ८३४ रुपये लाख, कोळवद–सांगवी बु.–बोरखेडा–हिंगोणा ते विटवा रस्ता (लांबी ३.१५ किमी) २७५ लाख रुपये, बोदवड तालुकांतर्गत साळशिंगी ते जलचक्र बु. ते प्रजिमा ४७ रस्ता (लांबी ५.५० किमी) ४७२ रुपये लाख व रावेर तालुकांतर्गत केऱ्हाळे–कर्जोद– निरूळ ते जिल्हा हद्द रस्ता (लांबी ४.५२ किमी) ४०७ लाख रुपये असे या २२ कि.मी. लांबीच्या ४ रस्ते कामासाठी २० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here