अमळनेरात नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
26

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील नाभिक समाजातील विविध परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा न्हावी पंचमंडळातर्फे गुणगौरव सोहळ्यात सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यासाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे भरीव सहकार्य लाभले.
यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या समाज बांधवांनाही विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले होते.

पू. साने गुरुजी वाचनालय (टाऊनहॉल) येथे झालेल्या कार्यक्रमात नाभिक समाजातील इयत्ता पहिली ते नववी (लहान गट), इयत्ता दहावी ते सर्व शाखांमधील पदवीपर्यंत (मोठा गट) च्या विद्यार्थ्यांना, आदर्श शिक्षक दत्तात्रय सोनवणे, शास्त्रीय संगीत शिक्षक तुषार देवरे, आयटी इंजिनियर भूषण ठाकरे, रेल्वे स्थानक व्यवस्थापक विशाल सोनवणे, उच्चशिक्षित शुभम सूर्यवंशी, आदर्श शिक्षक भगवान सोनवणे, आदर्श शिक्षक सतिलाल बोरसे, अहिराणी गीत-संगीतकार तुषार सैंदाणे, एम.बी.बी.एस. उत्तीर्ण भावेश बोरसे, संगीत व अभिनय क्षेत्रातील उगवता अभिनेता अक्षर ठाकरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. डिगंबर महाले, प्रा. नरेंद्र महाले, भगवान चित्ते, किशोर सूर्यवंशी, दिनेश महाले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य संपर्क प्रमुख किशोर सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोहर खोब्रागडे, महिला प्रदेशाध्यक्षा भारती सोनवणे, जिल्हाध्यक्ष रवींद्र नेरपगारे, युवक प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगारे, धुळे नाभिक मंचाचे भगवान चित्ते, व्याख्याता डॉ. नरेंद्र महाले, पंचमंडळाचे अध्यक्ष कैस सैंदाणे, रवींद्र बोरनारे, कायदेशीर सल्लागार ॲड. दिनेश पाटील, शांताराम खोंडे, सुरेश कुंवर, किशोर वाघ, प्रा. विजयसिंग पवार आदी मान्यवर होते. प्रास्तविक दीपक खोंडे तर सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here