Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»जामनेरला निवडणुकीसाठी मतदार सखी अन्‌ मित्रांची नेमणूक
    जामनेर

    जामनेरला निवडणुकीसाठी मतदार सखी अन्‌ मित्रांची नेमणूक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 24, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जामनेर : प्रतिनिधी

    लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जामनेर विधानसभा मतदारसंघातील ३२९ मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार मित्र व मतदार सखी यांची नेमणूक केली आहे. यासंदर्भात जामनेर येथील पंचायत समितीच्या कार्यालयात संबंधित मतदार मित्र आणि मतदार सखी यांच्यासाठी नुकतीच प्रशिक्षणासह आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे, तहसीलदार नानासाहेब आगळे, जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.

    मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी केंद्रनिहाय उत्स्फूर्त स्वयंसेवक यांना मतदार मित्र तर महिला मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी संबंधित मतदान केंद्रावरील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महिला पोलीस पाटील, महिला सरपंच यांची मतदार सखी म्हणून नेमणूक करण्यात आली. जामनेर विधानसभा मतदारसंघात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहयो अर्चना मोरे यांच्या संकल्पनेतून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नियोजन करण्यात आले.

    पोलीस पाटील यांचीही आढावा बैठक

    यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील यांचीही आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना देण्यात आल्या. कायदा व सुव्यवस्था तसेच प्रतिबंधात्मक कारवाई संदर्भात गाव पातळीवर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक शांतता अबाधित राहण्यासाठी करावयाच्या कारवाईच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.