डॉ.झाकीर हुसेन महाविद्यालयात खोटे/बनावट टीईटी प्रमाणपत्र प्राप्त शिक्षकांची नियुक्ती

0
60

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी

येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये बोगस/खोटे टीईटी प्रमाणपत्र प्राप्त दोन शिक्षकांची शिक्षक भरती लाखो रुपये घेऊन करण्यात आली असल्याची तक्रार संस्थेचे सभासद हाजी गुलाम मुस्तफा हाजी गुलाम दस्तगीर (समाजसेवक,रा.खिर्णीपुरा यावल),आसिफ खान ताहेर खान (सभासद संस्था,रा.बाबुजीपुरा यावल),युनूसखान रशिद खान (सभासद संस्था,रा.बाबुजीपुरा यावल) यांनी केल्याने यावल तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून यावल तालुक्यात बोगस टीईटी प्रमाणपत्र धारक शिक्षक यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

गुरुवार दि.8 सप्टेंबर 2022 रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे, तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग नाशिक उपसंचालक आणि जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या पुराव्यासह लेखी निवेदनात म्हटले आहे की, नॅशनल एज्युकेशन सोसायटी यावल यांच्याविरुध्द अनेक लेखी तक्रार आपल्या कार्यालयास सादर केल्या आहेत,संस्थेचे
कार्यरत असलेले कार्यकारणी मंडळ अनाधिकृत आहे.त्यांची घटना व नियमावली प्रमाणे त्यांचे कार्यकाळ डिसेंबर २०१८ मध्ये संपले आहे.त्यांनी सहआयुक्त धर्मादाय न्यास कार्यालय येथे खोट्या प्रोसिडींगच्या आधारे गुदतवाढीसाठी अर्ज केला आहे पण मा.सहआयुक्त यांनी आम्हाला लेखी स्वरूपात लिहून दिला आहे की या संस्थाची कोणत्याही प्रकारची मुदत वाढची परवानगी आमच्या कार्यालयांनी
दिली नाही.

तसेच दि.१४ में २०२२ रोजी नॅशनल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत,चालणारी भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील विद्यालय फखरोद्दीन अली अहमद येथे एकुण ५ शिक्षकांची व डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यावल येथे दोन शिक्षकांची असे एकूण 7 शिक्षकांची पदभरती संबंधितांकडून 25 ते 30 लाख रुपये घेऊन करण्यात आली आहे.

त्यापैकी वरणगाव येथील फखरोद्दीनअली अहमद उदु हायस्कुल व ज्यु. कॉलेजमध्ये मध्ये नियुक्त झालेल्या इंग्रेजी बी. ए.बी.एड.शिक्षक नांव मोहंमद आसिम मोहंमद साजीद यांनी नियुक्ती वेळी सादर केलेले प्रमाणपत्र खोटे आहे.सन २०१९ चे खोटेप्रमाणे पत्र यादीमध्ये त्यांचे नांव व बैठक क्र.३३२०३२२०७२ व अनुक्रमांक ३८०९ व पा. क्र. २२५ असा आहे. या तक्रार अर्जासोबत सोबत त्यांचे नियुक्ती पत्र व टीईटी खोटे प्रमाणपत्र जोडले आहे.तरी आपल्या कार्यालयात दि. १४/०५/२०२२ पासून लेखी तक्रार आहे की या संस्थांचे अध्यक्ष व कार्यकारणी मंडळ एफ-८९ चे लबाड आहे. यांनी केलेली शिक्षक भरती आपण तात्काळ रद्द करावी कारण लाखो रूपये घेऊन खोटे शिक्षकांची नियुक्ती करणारे संस्था चालका विरूध्द फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण यांनी शासनाची मोठी फसवणुक केली आहे.तरी यांनी शिक्षक मान्यता साठी दिलेला सर्व प्रस्ताव तात्काळ फेटाळण्यात यावा व यांना नोटीस दयावी की आपण केलेली ७ शिक्षक भरती तात्काळ रद्द करावी.असे सभासदांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे तसेच माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण उपसंचालक नाशिक, जिल्हा परिषद जळगाव शिक्षणाधिकारी काय कारवाई करतात याकडे नॅशनल एज्युकेशन सोसायटी सभासदांचे व संपूर्ण यावल तालुक्यातील शिक्षण क्षेत्राचे व संस्थाचालकांचे लक्ष वेधून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here