महाविकास आघाडीला आ.मंगेश चव्हाण यांचा अजून एक धक्का

0
277

धामणगावमधील राष्ट्रवादी एसपी गटाचे ग्रा. पं. सरपंच, सदस्यांचा भाजपात पक्षप्रवेश

साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव :

तालुक्यातील धामणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, विकासो संचालक यांनी आ.मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मार्केट संचालक कमिटी संचालक नवल पवार, माजी जि प सदस्य अनिल गायकवाड, सर्वोदयचे संचालक प्रशांत पाटील, भाजपा गटप्रमुख सुनील पवार, भूषण पाटील, शिवदास महाजन, ताराचंद मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी सरपंच लुभान बळवंत जगताप यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य एकनाथ सुभाषराव निकम, मनोज प्रभाकर निकम, दिलीप गोविंदराव जगताप, विकासोचे संचालक लालचंद जगन्नाथ मोरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मोरे, संदीप प्रभाकर निकम, पुंडलिक माधवराव मोरे यांचे आ.मंगेश चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचा रुमाल टाकून सर्वांचे स्वागत केले.

‘मविआ’कडे विकासात्मक नेतृत्वाचा अभाव

गेल्या साडे चार वर्षात विकासकामे करत असताना कुठल्याच गावात पक्ष, गट-तट असा भेदभाव केला नाही. दोन गावांना जोडणारे रस्ते, सभामंडप, गावतंर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना आदी भरघोस विकासकामे दिल्यामुळे इतर पक्षातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांचा भारतीय जनता पक्षाप्रति विश्वास वाढत आहे. तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांनी प्रभावित होत धामणगाव येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीकडे विकासात्मक नेतृत्वाचा अभाव असल्याने आगामी काही दिवसात अनेक पक्षप्रवेश होणार असल्याचे आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here