साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात सालाबादप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. त्यात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सांस्कृतिक गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. तसेच पारितोषिकाचे वितरणही करण्यात आले. पहिल्या पुष्पात अध्यक्षस्थानी राजेंद्र खाडिलकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र कवीश्वर, सुनंदा कवीश्वर, माजी विद्यार्थी तथा मडगव्हाणचे लोकनियुक्त सरपंच तारकेश्वर गांगुर्डे, स्वाती गांगुर्डे उपस्थित होते.
दुसऱ्या पुष्पात अध्यक्षस्थानी प्रा.रमेश बहुगुणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, नॅशनल युवा को-ऑप सोसायटी पुणेचे डायरेक्टर सरोज पांडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिलीप पाटील यांनी विशेष उपस्थिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी लोकमान्य विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक मनोहर महाजन यांनी अहवाल वाचन केले. कार्यक्रमाला लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस विवेकानंद भांडारकर, लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डॉ.प्रभाकर जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षिका मनीषा खांजोडकर, सूत्रसंचालन सायली देशपांडे, आशा सोनवणे, विजय सूर्यवंशी, संदीप महाजन तर आभार भूषण महाले, माधुरी सोनार यांनी मानले.