Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»चोपडा महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात
    चोपडा

    चोपडा महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoFebruary 15, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चोपडा : प्रतिनिधी

    येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात बुधवारी, १४ फेब्रुवारी २०२४ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात माजी शिक्षणमंत्री कै. ना. सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. सुरेश जी. पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली. सुरुवातीला संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.

    कार्यक्रमाला महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील आणि संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी होते.

    याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी मंडळ सदस्य बाजीराव पाटील, नियामक मंडळाचे सदस्य यशवंत खैरनार, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विश्‍वनाथ अग्रवाल, नियामक मंडळ सदस्य नंदलाल शिंदे, जळगाव ग.स. सोसायटीचे माजी संचालक रमेश शिंदे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर बाविस्कर, जळगाव येथील जनसेवक अनिल वर्मा, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, उपप्राचार्य एस. पी. पाटील, पर्यवेक्षक ए. एन. बोरसे, समन्वयक पी. एस. पाडवी तसेच महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डी. एम. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

    कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव कवयित्री बहिणाबाई कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी मनोगतात महाविद्यालयाचा परिसर व विद्यार्थी, प्राध्यापकांच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाप्रसंगी २०२३-२४ शैक्षणिक वर्षातील विविध खेळ, क्रीडा, युवारंग, विविध क्षेत्रातील कलागुण, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी विभाग व संपूर्ण शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम बक्षीस देऊन जवळपास १०० हून अधिक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे जळगाव येथील जनसेवक अनिल वर्मा यांना संस्थेतर्फे गौरवपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गौरवपत्राचे वाचन समन्वयक डॉ. एस. ए. वाघ यांनी केले.

    यांनी घेतले परिश्रम

    यशस्वीतेसाठी डॉ. व्ही. आर. हुसे, एम. ए. पाटील, डॉ. व्ही. आर. कांबळे, डॉ. सौ. के. एस. क्षीरसागर, डॉ. आर. आर. पाटील, डॉ. ए. एच. साळुंखे, व्ही. पी. हौसे, डॉ. डी. डी. कर्दपवार, डी. एस. पाटील, व्ही. डी. शिंदे, डॉ. ए. एच. साळुंखे, वाय. एन. पाटील, डॉ. एन. सी. पाटील, एस. जी. पाटील, निवृत्ती बी. पाटील, जी. बी. बडगुजर तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

    प्रास्ताविक तथा वार्षिक अहवाल वाचन वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख प्रा. डॉ. बी. एम. सपकाळ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय समन्वयक डॉ. एस. ए. वाघ यांनी करून दिला. सूत्रसंचलन डॉ. मधुचंद्र भुसारे आणि संदीप देवरे तर आभार कनिष्ठ विभागाचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख एन. बी. शिरसाठ यांनी मानले.

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Heartbreaking Incident In Chopra : दोन महिन्यांच्या चिमुकलीचा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू

    March 31, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.