साईमत धानोरा ता चोपडा वार्ताहर
धानोरा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त प्रतिमेला माल्यर्पण व पुजन करून गावात मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी सरपंच रज्जाक तडवी उपसरपंच विजय चौधरी, माजी प . स . उपसभापती माणिकचंद महाजन ग्रा.स गजानन कोळी, मुक्तार शेख, रविन्द्र शिरसाठ, पढंरीनाथ कुभार, चंद्रशेखर साळुके, प्रविण कोळी,गोकुळ साळूके, ज्ञानेश्वर सोनवणे आदी उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीचे औचित्य म्हणून मोहरदचे सरपंच अंजुम रमजान तडवी व हाजी रमजान तडवी यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना शेकडो वह्याचे वाटप केले अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनपटावर प्रा भरत शिरसाठ, फारुख शेख यांनी मार्गदर्शन केले .
कार्यक्रमसाठी भारतीय बहुजन मांतग संघ जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बोदडे, संजय बोदडे, आत्माराम बोदडे, मोहन बोदडे, सागर बोराडे, दिपक बोदडे, दिनेश बोदडे, भुषण पाचोने यानी परिश्रम घेतले .