तळेगावचे अनिल पगारे ‘भीमरत्न’ पुरस्काराने सन्मानित

0
14

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ आणि ऑल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेक्निशियन ॲण्ड आर्टिस्ट युनियनतर्फे विविध क्षेत्रात अष्टपैलु कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भीमरत्न राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण कस्तुरबा हॉल माटुंगा, मुंबई येथे नुकतेच करण्यात आले. त्यात चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील अनिल पगारे यांना सामाजिक क्षेत्रातील ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर भीमरत्न पुरस्कार २०२३’ सन्मानचिन्हासह सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला.

यावेळी अविनाश महातेकर (माजी राज्यमंत्री), शेखर मुंदडा (अध्यक्ष, गोसेवा आयोग महाराष्ट्र तथा महाएनजीओ फेडरेशन), अभिजित राणे (अध्यक्ष-धडक कामगार युनियन), नरवीर तानाजी मालुसरे, वंशज शितल मालुसरे, अनंत ऊके, भावेश तन्ना, दीपक काळींगण, गुलाब चांडक आदी मान्यवर उपस्थित होते.

अनिल पगारे यांच्या अंधश्रध्दा निर्मुलन, स्त्री-पुरुष समानता, व्यसनमुक्ती, आरोग्य, संविधान जनजागृती, शिक्षण, स्वच्छता तसेच मागासवर्गियांना शासकीय योजनांची माहिती आदींबाबत जनजागृतीचे कार्यक्रम २००६ पासून लोकसहभागातून राबवित असलेल्या कामांसाठी सामाजिक कार्याची व समाजाप्रती असलेल्या निस्वार्थ भावनेचा कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here