यावलला घंटागाडीअभावी संतप्त नागरिकांनी डस्टबिन आणले पालिकेसमोर

0
17

साईमत, यावल : प्रतिनिधी

शहरात ओला आणि सुका कचरा संकलन करण्याची घंटागाडी अनियमितपणे येत आहे. त्यामुळे यावल शहरातील संतप्त नागरिकांनी घरातील कचऱ्याचे डस्टबिनचे डबे नगरपालिकासमोर येऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

ओला आणि सुका कचरा संकलन करण्यासाठी संबंधित ठेकेदार आपल्या सोयीनुसार एक-दोन दिवसाआड फिरून अनियमितपणे यावल शहरात ओला व सुका कचरा संकलित करतात. लोकांच्या घरात ओला, सुका कचरा साचला जातो. त्यामुळे यावलकर वैतागले आहेत. शेवटी घंटागाडी न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करण्यासाठी आपआपल्या घरातील कचऱ्याचे डस्टबीनचे डबे उचलून नगरपालिका कार्यालयासमोर आणून निषेध व्यक्त केला. त्यामुळे यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रित करून ओला व सुका कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराचे पेमेंट करू नये, तसेच दर महिन्याला दिलेले पेमेंट वसूल करावे, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

ओला व सुका कचरा संकलन करण्यासाठी नगरपालिकेने मोबाईल नंबर उपलब्ध करून दिला आहे. त्या नंबरवर कोणी तक्रार केल्यास ओला व सुका घनकचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराची तक्रारदारांना दादागिरीसह दमदाटी करीत असल्याचेही दबक्या आवाजात चर्चिले जात आहे. अशा गंभीर घटनेची नोंद मुख्याधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अशी रस्ता अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here