साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील सामरोद येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची झालेली विटंबना ही आम्हाला क्लेशदायक आणि निषेधार्थ आहे. त्यामुळे जामनेर तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघावतीने निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्यावतीने दोषींवर तात्काळ कारवाई करून अटक करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने तहसिलदारांसह पोलीस निरीक्षकांना नुकतेच देण्यात आले. दरम्यान, तालुक्यात सर्वात मोठा मराठा समाज असल्याने गावागावात जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात यावा, असेही निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अतुल सोनवणे, तालुकाध्यक्ष आकाश बंडे, युवक तालुकाध्यक्ष अशोक पाटील, सागर पाटील, अविनाश बोरसे, रवी बंडे, सचिन बोरसे, प्रवीण गावंडे, सुरेश चव्हाण, विशाल लामखेडे, अतुल चौरे, मुकेश जाधव आदी पदाधिकाऱ्यांसह मराठा सेवक उपस्थित होते.