साईमत, चोपडा : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्यावतीने गणेश चतुर्थीनिमित्त तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरणाची सुरुवात केली आहे. शासकीय विश्रामगृह येथे तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरणास आ.लता सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी आ.चंद्रकांत सोनवणे, चोपडा भाग उपविभागीय अधिकारी बंगाळे, नायब तहसीलदार देवेंद्र नेतकर, गोदाम व्यवस्थापक योगेश नन्नवरे, पुरवठा निरीक्षक सुदर्शन दुर्योधन आदींसह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण चोपडा तालुक्यात ४६ हजार ८०८ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये चना डाळ, रवा, साखर व खाद्यतेल समाविष्ट आहे. पात्र लाभार्थ्यांना तातडीने वितरणाची सुरुवात केली आहे.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील, शिवराज पाटील, किरण देवराज, मंगला पाटील, शितल देवराज, कैलास बाविस्कर, राजेंद्र पाटील, रमेश ठाकुर, प्रकाश राजपूत, अशोक पाटील, दशरथ बाविस्कर, गणेश पाटील, प्रताप पावरा, किरण करंदीकर, भास्कर पाटील, दीपक कोळी, प्रवीण देशमुख, दिव्यांक सावंत, नंदु गवळी, संदीप कोळी, मुकेश कोळी यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बहुसंख्येने पात्र लाभार्थी उपस्थित होते.