साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे बाजारातील आनंदा मातेची विधीवत पूजा करून आनंदा आईला पाऊस पडावा म्हणून साकडे घालण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष खुशाल बिडे, शहर उपाध्यक्ष कैलास पाटील, शहर सचिव नंदकिशोर जाधव, मराठा महासंघाचे कायदेशीर सल्लागार ॲड. निळकंठ पाटील, ॲड. दीपक वाघ, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे किरण आढाव, चेतन आढाव, नामदेवराव तुपे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.
चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी यंदा श्रावण मासात पाऊस न पडल्याने हवालदिल झाला आहे. थोडीफार आलेली पिके करपून गेले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे चाळीसगाव तालुका दुष्काळी तालुका म्हणून घोषित करावा आणि जबाबदार लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांच्या पदरात नुकसान भरपाई तात्काळ टाकून त्यांना आर्थिक मदत करावी, असेही शहराध्यक्ष खुशाल बिडे यांनी मनोगत सांगितले.