साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
नाशिक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होण्याचे भाग्य लाभल्याचे मत भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत विजय पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.