साईमत, शहादा : प्रतिनिधी
कळंबू ता. शहादा येथील देवरे (माळी) कुटुंबातील पांडुरंग सोनू देवरे यांचे अल्प आजाराने आठवडाभरापूर्वी निधन झाले. मुलाच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने दशक्रिया विधी होण्याआधीच वयोवृद्ध आईनेही जगाचा निरोप घेतला. यामुळे गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
उतारवयात मुलाच्या खांद्यावर जाण्याच्या व्ोळेत आपल्या आधीच मोठ्या मुलाचा मृत्यू झाला. या विरहाने आईला धक्का बसला. अन.. खाणे-पिणे बंद झाले. यातून प्रकृती खालावून एका आठवड्यात आईचेही निधन झाले. मुलाच्या व आईच्या निधनाने देवरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.कळंबू (ता. शहादा) येथील निवृत्त वीज वितरण कर्मचारी झेंडू देवरे, रमेश देवरे यांच्या मातोश्री व भरत देवरे यांच्या आजी नवसाबाई सोनू देवरे यांचे वयाच्या शतकानंतरही खाणे-पिणे व्यवस्थित होते. सुना, मुले, नातवंडे यांच्याकडून त्यांची काळजी घेतली जात असल्याने प्रकृती ठणठणीत होती, मात्र सुखकाळात मोठा मुलगा पांडुरंग देवरे यांचे आजारपणाने काही दिवसांतच निधन झाले. तो धक्का सहन न झाल्याने नवसाबार्इंनीही प्राण सोडला. मुलगा व आईचा दशक्रिया विधी एकाच व्ोळी करण्याची वेळ कुटुंबियांवर आली.