सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीकडून उत्कृष्ट मिरवणुकीला पुरस्कार देणार

0
7
Version 1.0.0

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीकडून उत्कृष्ट मिरवणुकीला पुरस्कार देणार

जळगाव (प्रतिनिधी )-

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शहरात १६ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त पूर्वतयारीसाठी विष्णू भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली हाउसिंग सोसायटी हॉल येथे बैठकीचे आयोजन केले होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीकडून यंदा उत्कृष्ट मिरवणुकीला पुरस्कार दिला जाणार आहे.

यावर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा म्हणुन प्रतिभाताई शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. २० वर्षापासून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. सामाजिक ऐक्य, शिवाजी महाराजांचा इतिहास याबाबत बौद्धिक प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे केले जाते . यावर्षीही शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने विविध उपक्रम राबवण्याचे निर्णय घेण्यात आले.

यावर्षी 18 फेब्रुवारीरोजी सायंकाळी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिलांची मशाल मिरवणूक काढण्यात येईल. ही मिरवणूक शिवाजी स्टेडियम येथून सुरू होईल महात्मा फुले, छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून शिवस्मारकावर या मिरवणुकीचा समारोप करण्यात येईल.

19 फेब्रुवारीरोजी शोभायात्रा काढून शिवस्मारकावर शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल. यावर्षी प्रथमच शहरातील शिवजयंती मंडळाना सर्वांनी सायंकाळी मिरवणुका आपापल्या परिसरातून सुरवात करून खान्देश मॉल येथे पोहचून शिवस्मारकावर समारोप करावा असे आवाहन करण्यात आले आहे या मार्गावरील उत्कृष्ट मिरवणूक काढणाऱ्या मंडळांना अनुक्रमे 20, 000, 15, 000 व 10000 रूपये तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट जिवंत देखावा, उत्कृष्ट लेझिम पथक, आदर्श व शिस्तबद्ध आयोजन, सामाजिक संदेश अशी पाच प्रत्येकी 5, 000 रूपयांची बक्षिसेही देण्यात येणार आहेत..शिवजयंती सर्वधर्मीय व सर्वजाती बांधवांनी एकत्रित येऊन शांततेत व एकजुटीने साजरी करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले

या बैठकीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष अ.कारीम सालार, कार्याध्यक्ष कैलास सोनवणे, सचिव राम पवार, कोशाध्यक्ष सचिन धांडे. उपाध्यक्ष रोहित निकम, लीना पवार, जयश्री महाजन, मुकुंद सपकाळ, निलेश पाटील, विष्णू भंगाळे, समिती सदस्य पुरुषोत्तम चौधरी, अजबसिंग पाटील, दीपक सूर्यवंशी , संतोष पाटील , प्रफुल्ल पाटील, खुशाल चव्हाण, योगेश नन्नावरे , अविनाश बाविस्कर , फईम पटेल, साजिद शेख, सत्यजित साळवे, मार्गदर्शक प्रा. डी. डी . पाटील, बच्छाव सर, श्रीराम पाटील, प्रमोद पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, जगन्नाथ पाटील, समन्वयक सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील, कुलभूषण पाटील. किरण बच्छाव, शंभू पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here