कार शोरुममध्ये गाडी दाखविताना घडला अपघात, कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

0
18
कार शोरुममध्ये गाडी दाखविताना घडला अपघात, कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

साईमत नंदूरबार प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील टाटा मोटर्स कंपनीच्या शोरूम मध्ये २१ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ग्राहकाला टाटा कंपनीचे चारचाकी वाहत दाखवत असताना अनावधानाने सेल्स एक्झिक्युटिव्ह च्या माध्यमातून एक अपघात झाला या अपघातात शोरूम मधीलच कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जून २०२३ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास टाटा शोरूम मध्ये सेल्स एक्झिक्यूटिव्ह दीपक इंद्रसिंग राजपूत हे आलेल्या ग्राहकांना टाटा कंपनीची कारची माहिती देत असताना अनावधानाने कार सुरू झाली व एक्सीलेटर जोरात दिल्या गेल्याने दुसऱ्या कार वर जाऊन आदळली या अपघातात कारची साफसफाई करणारा कर्मचारी जितेंद्र वसंत शिरसाठ (वय ४२ वर्ष ) हे कारमध्ये दबले गेले. यात ते गंभीर जखमी झाले त्यांना त्याच अवस्थेत शोरूम मधील कर्मचाऱ्यांनी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जितेंद्र वसंत शिरसाठ यांना मृत घोषित केले याप्रकरणी २२ जून २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सुभाष भगवान बच्छाव रा. गुरुदत्त हाउसिंग सोसायटी, शहादा यांच्या फिर्यादीवरून टाटा शोरूम मधील सेल्स एक्झिक्यूटिव्ह दीपक इंद्रसिंग राजपूत रा. लक्ष्मी नगर नंदुरबार यांच्याविरुद्ध भादवि कलम ३०४ अ २७९,३३७, ३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार जगदीश पवार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here