साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील महाविद्यालयात ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाअंतर्गत संकलित केलेले अमृत कलश यात्रेचे १६ ऑक्टोबर रोजी आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.ए.व्ही.काटे, उपप्राचार्य प्रा.वसईकर, उपप्राचार्य डॉ.खापर्डे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.आर.बोरसे, सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.डी.बी.पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.बंस्वाल, सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.पंकज वाघमारे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.पगार, प्रा.अंकुश जाधव, वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.उंदिरवाडे, प्रा.प्रमोद पवार यांच्यासह रासेयोचे स्वयंसेवक उपस्थित होते.
अमृत कलश म्हणजे आपल्या मातीला आणि मातेला वंदन करणे होय. असे पूर्ण भारतातील अमृत कलश संकलित करण्यात येऊन दिल्ली येथे त्यांचे सामूहिक पूजन केले जाणार आहे. त्यानंतर याच उपक्रमाचा भाग म्हणून रासेयो आणि वनस्पती शास्त्र निर्मित अमृत रोपवाटिकेचे उद्घाटन प्राचार्यांनी करुन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे आवाहन केले.
यशस्वीतेसाठी रघुनाथ खलाल, रासेयोचे स्वयंसेवक किरण निकम, नितीन शेवाळे, चेतन राठोड, संदीप बागुल, वासुदेव सोनवणे, यशवंत मोरे, रोहित देवरे, योगेश महाले, कृष्णा माळी, हर्षल शिंदे, किरण निकम, नितीन शेवाळे, चेतन राठोड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.डी.बी.पाटील तर आभार प्रा.आर.आर.बोरसे यांनी मानले.