नियुक्तीबद्दल सर्वत्र कौतुक
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल पढार यांची नियुक्ती करण्यात आली. पहिले अखिल भारतीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र चालक यांचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे नुकतेच पार पडले. अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर धाबे होते.
त्यात पिंप्राळा येथील आराध्य सायबर सेलचे संचालक अमोल पढार यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली. या नियुक्तीबद्दल अमोल पढार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अधिवेशनात राज्यभरातून हजारोंच्या संख्येने केंद्र चालक उपस्थित होते.