अमी बिग बटरफ्लाय मंथ सप्टेंबर २०२३ निमित्त ऑनलाईन ‘फुलपाखरू प्रश्न मंजुषा सप्टेंबर २०२३’ स्पर्धा

0
20

साईमत : जळगाव : प्रतिनिधी

बिग बटरफ्लाय मंथ सप्टेंबर २०२३ निमित्त ऑनलाईन ‘फुलपाखरू प्रश्न मंजुषा सप्टेंबर २०२३’ स्पर्धा निसर्गमित्र जळगाव तर्फे आयोजित केली असल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.

भारतात ५ सप्टेंबर २०२० पासून सप्टेंबर महिना हा ‘महा फुलपाखरू महिना ‘म्हणून साजरा करण्यात येतआहे. फुलपाखरे ही उत्तम ‘बायो इंडिकेटर’ समजली जातात. त्यांचे जतन व संवर्धन होणे ही तातडीची गरज आहे. त्यासाठी प्रथम फुलपाखरांचे जीवनचक्र समजून घेणे गरजेचे आहे.
यासाठी आम्ही निसर्गमित्र जळगाव तर्फे १५ सप्टेंबर रोजी ‘फुलपाखरू प्रश्न मंजुषा सप्टेंबर २०२३’ प्रसारीत करीत असल्याचे पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले. प्रश्नमंजुषा ही मराठी व इंग्रजीत सोडवता येणार आहे. प्रश्नमंजुषा १५ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत सोडवता येईल. त्यानंतर सहभाग प्रमाणपत्र पाठवण्यात येणार नाही. सर्व वयोगटातील पर्यावरण प्रेमी नागरिक बंधू,भगिनींनी आपला थोडासा वेळ काढून या उपक्रमात सहभागी व्हावे व ही प्रश्नमंजुषेची लिंक आपल्या मित्र,मैत्रीणी व स्नेहींना पाठवावी व फुलपाखरु महिना साजरा करण्यात सहभागी व्हावे असे आवाहन पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी केले आहे. माहिती व लिंक साठी WhatsApp क्रमांक- ८९९९८०९४१६ वर संपर्क करावा.पुढील लिंक सर्वत्र पाठवा लिंक – https://forms.gle/ipAbeLt2V52be1yH9

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here