Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नाशिक»अंबड लिंकरोडवर खड्डा चुकविताना दुचाकी घसरली, महिलेचा मृत्यू
    नाशिक

    अंबड लिंकरोडवर खड्डा चुकविताना दुचाकी घसरली, महिलेचा मृत्यू

    SaimatBy SaimatAugust 31, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, नाशिक : प्रतिनिधी
    शहरासह जिल्ह्यातील अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे सातत्याने दिसून येत असून अपघातांची मालिका सुरूच आहे. शहरातील अंबड लिंकरोडवर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली असून एका महिलेला जीव गमवावा लागला आहे.

    येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दोन दिवसांत दोन अपघाती मृत्यू झाल्याने स्थानिकांसह वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकचा सातपूर अंबड-लिंक रोड खड्डे आणि अपघातांच्या घटनेमुळे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोमवारी सकाळी खड्डा चुकवण्याच्या नादात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली असतांनाच सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी याच रस्त्यावर पुन्हा अपघात घडला. ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन पूनम नितीन चव्हाण या महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघाताची संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. पूनम आपल्या नातेवाईकासोबत पल्सर या दुचाकीवरून जात असतांनाच पाठीमागून आलेल्या ट्रकचा मोटरसायकला कट लागला आणि मोटारसायकल रस्त्यावरून घसरली. त्यात पूनम मागच्या चाकाखाली डोकं येऊन त्या गंभीर रित्या जखमी झाल्या. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी हलवण्यात येताच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर येथील पुनम चव्हाण या अपंग वडिलांच्या देखभालीसाठी काही दिवसांपूर्वीच शहरात आली होती. चुंचाळे शिवारातील म्हाडा वसाहतीत अपंग वडिल राहतात. त्यांच्या देखभालीसाठी पुनम चव्हाण आली होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास ती शेजारी राहणाऱ्या नातेवाईकासोबत या दुचाकीवर सातपूर येथे जात असतांना हा अपघात झाला. सातपूर अंबड लिंकवरून दोघे डबलसीट प्रवास करीत असतांना काळे भांडे डेपोच्या समोरील बाजूने एक्स्लो सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीस हुलकावणी दिली. त्यामुळे दुचाकी पडून दुचाकीस्वार डाव्या बाजूला, तर मागे बसलेल्या पूनम चव्हाण उजव्या बाजूला पडल्या. त्यात वाहनाचे चाक पूनम यांच्या उजव्या पायावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना नातेवाइकांनी तत्काळ एस्क्लो सर्कल येथील खासगी रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Nashik:“खरात प्रकरण: मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम इशारा दोषींना कोणतीही सूट नाही”

    March 22, 2026

    Nashik Mhada Scam : म्हाडा भूखंड घोटाळा; मनवानी कोठडीत, बिल्डर लॉबी थरथरली

    March 20, 2026

    Premium Petrol Price Today Updates : जागतिक तेल किंमती वाढल्यामुळे भारतात प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ; साध्या पेट्रोल व डिझेलवर परिणाम नाही

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.