साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सानेगुरुजी पूर्व प्राथमिक बालविकास मंदिराचे स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बालविकास अधिकारी योगिता चौधरी, प्रेमलता पाटील, संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सहसचिव ॲड.अशोक बाविस्कर, संचालक मंडळाचे सदस्य काका देशमुख, पत्रकार किरण पाटील, मगन पाटील, सानेगुरुजी कन्या हायस्कुलच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे उपस्थित होत्या.
बालविकास मंदिराच्या मुख्याध्यापिका वैशाली महाजन यांच्यासह सर्व शिक्षिकांनी महिन्याभरापासून चिमुकल्यांची विविध गाणी बसविली. त्यांची रंगीत तालीमही करून घेतली. त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन संमेलन यशस्वी करून दाखविले.
एवढेच न करता चिमुकल्यांसह महिला पालकांकरीता खेळाचे आयोजन करून स्वतः मुख्याध्यापिका, सर्व शिक्षिकांनी मिळून ग्रामीण भागातील पहाट कशी उगविते? गावातील बायकांची लगबग कशी सुरु असते? सकाळच्या प्रहरी वासुदेवाची मंजुळ गाणी अगदी हुबेहूब सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सर्वात शेवटी सर्व महिलांनी नाचगाण्याचा मनसोक्त आनंद लुटला. त्यानंतर संमेलनाची सांगता झाली.