अमळनेरला मंत्रघोष, स्तवनगीते, मंगलवाद्यासह रंगला मूर्ती प्रतिष्ठापना महासोहळा

0
6

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात १ ते ३ मार्च दरम्यान श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता या मूर्तींचा विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळा मंत्रघोष, स्तवनगीते, मंगलवाद्यासह भक्ती आणि चैतन्याची अनुभूती देत मंगलमय वातावरणात हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला. ३ रोजी संतश्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते विविध मूर्तींचे विधिवत पूजन व मंत्रोपचारात लोकार्पण झाले. महासोहळ्याचे आपणही साक्षीदार व्हावे, ही सद्भावना ठेवून हजारो भाविकांनी सकाळपासूनच मंदिर परिसरात गर्दी केली होती. आजच्या पूर्णाहुती महासोहळ्याला गोदावरी फाउंडेशनचे डॉ. वैभव पाटील, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील आणि नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील आहेर यांची विशेष उपस्थिती लाभली.

सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या पूर्णाहुती पूजे दरम्यान प्रात:पूजन, देव प्रबोधन, प्रासाद प्रवेश, उत्तरांगहवन, बलिदान, प्राणप्रतिष्ठा, महापूजा झाली. त्यानंतर प्रसाद महाराजांच्या हस्ते पूर्णाहुती होऊन महाआरतीने भक्तिमय वातावरणात महासोहळ्याची सांगता झाली. दरम्यान प्रसाद महाराजांच्या हस्ते अतिशय निसर्गरम्य मंगळग्रह मंदिर परिसरात शेषशय्येवर विराजमान भगवान श्री विष्णू व माता श्री लक्ष्मी आणि शिव परिवार या आकर्षक मूर्तींचेही लोकार्पण करण्यात आले.

पूजेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, पुणे ग्रामीण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी हिंद केसरी पहेलवान विजय चौधरी, अमळनेर पोलीस निरीक्षक विकास देवरे, ज्येष्ठ पत्रकार निखिल सूर्यवंशी, नाशिक जि.प.चे माजी सदस्य सुनील आहेर, पुणे येथील सीनिअर सर्जन शहाजी चव्हाण, शिरपूरचे गटविकास अधिकारी संजय सोनवणे, डॉ. महेंद्र ठाकरे, गोरखनाथ चौधरी, ए. डी. भदाणे हे सपत्नीक पूजेचे मानकरी होते.

यांनी केले पौराहित्य

वेदमूर्ती केशव पुराणिक शास्त्री, सागर कुलकर्णी शास्त्री, प्रतीक मुळे शास्त्री, प्रसाद साठे शास्त्री, वैभव जोशी शास्त्री, प्रसाद भंडारी शास्त्री, तुषार दीक्षित शास्त्री, जयेंद्र वैद्य शास्त्री, गणेश जोशी शास्त्री, अक्षय जोशी शास्त्री, मंदार कुलकर्णी शास्त्री, चंद्रकांत जोशी शास्त्री, विनोद पाठक शास्त्री, हेमंत गोसावी शास्त्री, नरेंद्र उपासनी शास्त्री, सारंग पाठक शास्त्री, सुनील मांडे शास्त्री, व्यंकटेश कळवे शास्त्री यांनी पौराहित्य केले.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एन. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्‍वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, मंगल सेवेकरी विनोद कदम, व्ही. व्ही. कुलकर्णी, प्रकाश मेखा, आशा महाले, आनंद महाले, स्वाती महाले, डी. ए. सोनवणे, पुषंद ढाके, आशिष चौधरी, उज्ज्वला शहा, विशाल शर्मा आदींसह मंदिरातील सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here