साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील दादासाहेब जी.एम.सोनार नगर येथे प्रती शेगावचे संत गजानन महाराज मंदिरात शिवजयंतीचे औचित्य साधत गजेश्वर महादेव मंदिरात नुकतीच महादेवाच्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा सोहळा अत्यंत उत्साहात पूर्ण झाल्याने परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
गजेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा विधीत हवन, पीठ स्थापन, स्तपन विधी, जल दिवस, धान्य दिवस, पूर्णा आहुती अशोक भावे महाराज आचार्यत्व यांनी केली. वेदशास्त्र संपन्न देवेंद्र शास्त्री गडीकर, नितीन भावे महाराज, सारंग गुरुजी, शुभम गुरुजी, अरविंद गुरुजी, विनू गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विधीवत प्राणप्रतिष्ठा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलश रोहण ईश्वरदास महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. सोहळ्यात प्रा. आर.बी.पवार, ज्योती पवार, चेतन उपासनी, प्रिया उपासनी, प्रा.हिरालाल पाटील, निशा पाटील, प्रमोद महाजन, वृषाली महाजन हे दोन दिवस पुजेचे मानकरी होते.
यांनी लावला आर्थिक हातभार
मुंबई येथील जगन्नाथ महाजन यांनी १ लाख रुपये तर गजानन महाराज संस्थानच्या विश्वस्त व महिलावारी प्रमुख ज्योती राजेंद्र पवार यांनी ५१ हजार रुपये, अरुण भावसार यांनी २५ हजार रुपये आणि संत गजानन महाराज महिला सत्संग परिवार, अमळनेर यांनी ३५ हजार रुपये आर्थिक योगदान दिल्यामुळे गजेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा करता आली. याबद्दल सर्वांचे अध्यक्ष प्रा आर.बी.पवार यांनी आभार व्यक्त केले.
गजेश्वर महादेव मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कल्याणी भावे, रेवा पाटील, सरला चव्हाण, नंदिनी पाटील, माई, हिराबाई पाटील, बबीता पवार, वैशाली गोसावी, नितल पाटील, कीर्ती शेलकर, सुनीता बागुल, मंगल पाटील, आशा पाटील, ॲड.रानुताई पाटील, विश्वनाथ सोनवणे, विजय येवले, अभिमन पाटील, सुभाष पाटील, पंकज येवले, मोहीत पवार, मधुकर शिंपी, जयवंतराव पाटील, श्रीकृष्ण चव्हाण, रघुनाथ पाटील, संजय पाटकरी, ह.भ.प.पुंडलिक पाटील कळमसरेकर, संत गजानन महाराज परिवाराचे सहकार्य लाभले.