अमळनेरला आर्मी स्कुलचे ‘उत्सव आनंदाचा’ स्नेहसंमेलन उत्साहात

0
14

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील विजय नाना पाटील आर्मी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेज येथे ‘उत्सव आनंदाचा’ स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात साजरे करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रमातून उत्कृष्ट सादरीकरण केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब विजय नवल पाटील, युवा उद्योजक अभिषेक पाटील यांच्यासह मान्यवरांना पथसंचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. यासाठी प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब सुभेदार भटू पाटील यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष विजय नवल पाटील होते. सर्वप्रथम सरस्वतीचे पूजन होऊन रुक्मिणीताई आणि नवलभाऊ यांच्या प्रतिमेचेही पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्ज्वलन करुन स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांचे प्राचार्य पी.एम. कोळी, युवा उद्योजक अभिषेक पाटील यांचे प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, नरेंद्र निकुंभ यांचे सुभेदार मेजर श्रीराम पाटील तर दिनेश नाईक यांचे नायब सुभेदार भटू पाटील यांनी स्वागत केले. सर्व मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

प्रास्ताविकात प्राचार्य पी.एम.कोळी यांनी स्नेसंमेलनाचे उद्दिष्ट सांगितले. तसेच नरेंद्र निकुंभ, दिनेश नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. आर्मी स्कुलच्या विद्यार्थ्यांचे सैन्यदलातील योगदान आणि शहरातील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलनाचे कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतात विजय नवल पाटील यांनी सैनिकी शाळेतील मुलांचे भारतीय सैन्य दलामध्ये कसे योगदान आहे, हे पटवून सांगितले.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात नृत्य, समूह नृत्य, मूक अभिनय, नाटिका, लावणी, देशभक्तीपर गीते, गीतगायन, ब्रेकडान्स अशा सर्व कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कराचे प्रदर्शन घडविले. लावणीतील प्रणव निकम, सुदर्शन पाटील, चेतन पाटील ह्या विद्यार्थ्यांनी केलेल्या महिला वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. देशभक्ती गीत आणि रामायणातील दृश्‍यांचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. रामायणातील पात्रांच्या मनमोहक सादरीकरणाला विजय नवल पाटील यांनी पाच हजारांचे बक्षीस दिले. याबद्दल त्यांनी मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती प्राजक्ता शिंदे यांचेही कौतुक केले. सर्व कार्यक्रमांना पालकांसहित शिक्षकांनीही दाद दिली.

यावेळी संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड, नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी.बी.पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रा. श्‍याम पवार, रुख्मिणीताई प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी बी.टी.पाटील, रुख्मिणीताई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जे.शेख, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.पी.चौधरी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शुभांगी चव्हाण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य के.बी.बाविस्कर, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक व्ही.जी. बोरसे, एस.एन.महाले, व्ही.डी.पाटील तसेच सर्व समिती प्रमुख, सर्व वर्ग शिक्षक, सहाय्यक शिक्षक, शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी-शिक्षक, विद्यार्थिनी, शिक्षिका, सहभागी विद्यार्थी, इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतीक प्रमुख शरद पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय बी. डी. पाटील यांनी करुन दिला. सांस्कृतीक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता शिंदे तर आभार प्रसिद्धी प्रमुख अनिल पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here