साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील महिला महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला. यावेळी सर्व विद्यार्थिनींनी कार्यक्रम संपल्यावर महाविद्यालयातील ग्रंथालयाला भेट देऊन विविध प्रकारची पुस्तके चाळली. कार्यक्रमात बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेतली. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
यावेळी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवन, पुस्तक आणि आत्मचरित्राविषयी परिचय करून दिला. त्यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून का संबोधले जाते तर त्यांनी ‘अग्नी’ आणि ‘पृथ्वी’ ही स्वदेशी क्षेपणास्त्र तयार केली. एक शिक्षक भारताचे राष्ट्रपती आणि मुख्य म्हणजे ते एक व्यक्ती म्हणूनही प्रसिद्ध होते, अशी माहिती प्रा. इंद्रायणी सैंदाणे यांनी दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख यांनी विद्यार्थिनींना वाचन करण्यास प्रेरणा दिली.
यावेळी दिलीप गोलाईत यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच ग्रंथालयातील विविध पुस्तके मराठी, हिंदी, इतिहास, जनरल नॉलेज आणि स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तकांसह विविध प्रकारची मासिक आणि वर्तमानपत्रांचीही माहिती दिली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. प्रा. चारुशीला ठाकरे यांनी आभार मानले.