अमळनेरला रविवारी ओबीसी आरक्षण निर्धार मेळावा

0
34

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने संस्थापक-अध्यक्ष ना. छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्रात गुजरात, केंद्रीय माळी समाज सुधार यांच्या प्रयत्नाने रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील क्षत्रिय काच माळी समाज मंगल कार्यालयात ओबीसी आरक्षण निर्धार मेळावा आयोजित केला आहे. माळी समाज बांधवांसह महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र माळी समाज महासंघातर्फे केले आहे.

ओबीसी आरक्षणावर गदा येता कामा नये, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, जातीनिहाय जनगणना व्हावी आदी मागण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी नगराध्यक्ष भरत माळी तळोदा, शिरपूरचे माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सुभाष राऊत बीड, माजी आमदार शिरीष चौधरी, जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिकराम मालकर, सुधारणा मंडळाचे अध्यक्ष ए.के.गंभीर, सेवानिवृत्ती तहसीलदार सुदाम महाजन, परिषदेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख अनिल नाळे, केंद्रीय माळी समाज सुधार मंडळाचे बाबुराव घोंगडे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाजन आदी उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र माळी समाज महासंघातर्फे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here