शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा घेतला निर्णय
साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने आणि त्यावर वारंवार आश्वासन देऊनही आपण आश्वासित मागण्यांवर निर्णयांची अंमलबजावणी त्वरित नसल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने पूर्वी दिलेल्या इशारा पत्रानुसार यावर्षी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक यावर्षी शिक्षक दिन ‘अन्याय दिवस’ म्हणून यादिवशी आंदोलन करून सरकारच्या निषेधार्थ राज्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसिलदारांना धरणे धरून निवेदन देतील.
यानिमित्त अमळनेर तालुका जुक्टो संघटनेच्यावतीने अमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना अमळनेर तालुका जुक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिनेश बी. बोरसे, सचिव प्रा. स्वप्नील पवार, जळगाव जुक्टो संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. सुनील पाटील, संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार प्रा. दिनेश भलकार, प्रा. सी.बी. सूर्यवंशी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. गजानन धनगर, प्रसिद्धी प्रमुख प्रा. किरण पाटील, प्रा.वसंत पाटील, प्रा.विलास पाटील, प्रा.प्रशांत ठाकुर, प्रा. सी.आर.पाटील, प्रा पंकज तायडे, प्रा. बी.आर. गुलाले, प्रा.ए.आर.पवार, प्रा.जितेश संदानशिव, प्रा.बापू संदानशिव, प्रा देवेंद्र वानखेडे, प्रा.आर. एस. महाजन, प्रा.योगेश वाणी, प्रा.स्वप्निल भांडारकर, प्रा.दीपक पवार, प्रा.एस.बी.शेलकर यांनी निवेदन दिले.