Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»Cooperation Minister Babasaheb Patil : अमळनेर बाजार समितीने उत्पन्नातून लोकोपयोगी कामे करावी : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
    अमळनेर

    Cooperation Minister Babasaheb Patil : अमळनेर बाजार समितीने उत्पन्नातून लोकोपयोगी कामे करावी : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 31, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेरला विविध विकास कामांच्या पायाभरणीप्रसंगी आवाहन

    साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :

    कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या उत्पन्नातून लोकोपयोगी कामे उभी करावी, असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. ते कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभप्रसंगी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ.अनिल पाटील उपस्थित होते. याप्रसंगी बाजारसमितीच्या आवारात ‘माझा शेतकरी माझा अभिमान’, शेतकरी प्रेरणास्थळाचे, भव्य गोडाऊन शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले. शासनाने शेतकऱ्यांच्या विविध थकबाकी लवकर अदा केल्यास शेतकरी आनंदी होईल, अमळनेर बाजार समितीच्या विकासाच्या दृष्टीने विविध योजनांना प्राधान्याने पाठबळ द्यावे, असे आवाहन आ.अनिल पाटील यांनी केले.

    याप्रसंगी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे चेअरमन संजय पवार, माजी जि.प.सदस्या जयश्री पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय नेमाडे, माजी जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, रिता बाविस्कर यांच्यासह विभागीय निबंध संभाजी निकम, जिल्हा निबंधक गौतम बलसाने, ऑडिटर के.डी.पाटील, बाजार समितीचे संचालक डॉ.अनिल शिंदे, डॉ.अशोक पाटील, समाधान धनगर, पुष्पा पाटील, सुषमा पाटील, भाईदास भील, प्रकाश अमृतकार, ऋषभ पारेख, गट सचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, सचिव डॉ.उन्मेष राठोड आदी उपस्थित होते.

    कार्यक्रमात बाजार समितीच्या जिल्ह्यासह विभागात आणि राज्यात झालेल्या नावलौकिकाबद्दल बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील यांच्यासह संचालक मंडळाचा सत्कार केला. मान्यवर, लोकप्रतिनिधी यांना बाजार समितीतर्फे महात्मा बळीराजा यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

    विविध संघटनांतर्फे सहकार मंत्र्यांचा सत्कार

    याप्रसंगी आदर्श सरपंच नरेंद्र पाटील, नितीन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच व्यापारी असोसिएशन तसेच हमाल मापाडी संघटना, गटसचिव संघटनेतर्फे ना.बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला.अमळनेर बाजार समिती ही शेतकरी हिताचे निर्णय घेत व्यापारी ते हमाल मापाडी, गुमास्ता अशा सर्वांना सोबत घेऊन मार्गक्रमण करीत आहे, असे बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.सूत्रसंचालन अमळनेर अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन रणजित शिंदे तर आभार संचालक हिरालाल पाटील यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner:चार जणांकडून साईड न दिल्याच्या वादातून व्यापाऱ्याच्या कारची तोडफोड

    February 20, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026

    Amalner : पिळोदे गावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.