
साईमत अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहराचा सर्वांगीण विकास लक्षात घेऊन विविध क्षेत्रांतील मोठी प्रकल्पे जलदगतीने आकार घेत आहेत. महिला, विद्यार्थी, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा ओळखत अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या माध्यमातून माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कामे पुढे सरकत आहेत. शहरात उभा राहत असलेला भव्य क्रीडा संकुल, मंगळग्रह मंदिराचा सुरू असलेला कायापालट, झामी चौकातील नव्या जलकुंभाचे काम, शिवाजी उद्यानाचे सुशोभीकरण, तरुणांसाठी अभ्यासिका उभारणी आणि पैलाड स्मशानभूमीचे नूतनीकरण—अशा अनेक प्रकल्पांमुळे अमळनेरची विकासयात्रा अधिक वेगवान होत आहे.
तरुणांसाठी नवी संधी : १० कोटींचे अत्याधुनिक क्रीडा संकुल
मारवड रस्त्यावर उभे राहत असलेले १० कोटी निधीतून बांधले जाणारे क्रीडासंकुल सध्या शहरातील तरुणाईचा नवा आधार ठरत आहे. स्पर्धा परीक्षांच्या मैदानी चाचण्यांपासून पोलिस व सैन्य भरतीची तयारी, शारीरिक तंदुरुस्तीच्या उपक्रमांपर्यंत हजारो तरुणांना येथे हक्काचे मैदान उपलब्ध झाले आहे.
संकुलात समाविष्ट सुविधा —
-
बॅडमिंटन कोर्ट
-
माती व गादीवरील कुस्तीपेढी
-
मानक जॉगिंग ट्रॅक
-
टेबल टेनिस व्यवस्था
-
ओपन जिम
-
विविध मैदानी प्रशिक्षण सुविधा
बंगाली फाईल, तांबेपुरा, पिंपळे रोड, गलवाडे रोड, मारवड रोड, ढेकू रोड आणि शहरातील इतर भागांतील तरुण मोठ्या संख्येने या संकुलाचा लाभ घेत असून, भविष्यातील करिअरसाठी हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
मंगळग्रह मंदिराचा कायापालट—पर्यटनाला नवी दिशा
देशभरात अमळनेरची वेगळी ओळख निर्माण करणारे मंगळग्रह मंदिर आता नव्या स्वरूपात सजू लागले आहे. आमदार अनिलभाईदास पाटील यांच्या निधीतून मिळालेल्या २५ कोटींच्या विकासनिधीमुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण सुरू आहे.
नवे प्रवेशद्वार, सौंदर्यीकरण, पर्यटक सुविधांची उभारणी या कामांमुळे आगामी काळात मंदिर परिसर पर्यटनाचे प्रमुख आकर्षण बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
झामी चौकातील जुना व जीर्ण जलकुंभ पाडून त्याठिकाणी ३ कोटी खर्चून नवा जलकुंभ उभारला जात आहे.
यातून —
-
माळी वाडा
-
कसाली मोहल्ला
-
अमलेश्वर नगर
तसेच आसपासच्या वसाहतींची पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे.
पैलाड भागातील मुख्य स्मशानभूमीची जीर्ण अवस्था लक्षात घेऊन १ कोटींच्या निधीतून व्यापक नूतनीकरण सुरू आहे.
यात —
-
परिसराचे सुशोभीकरण
-
अंत्यसंस्कार सुविधांची सुव्यवस्था
-
पर्यावरणपूरक विद्युत दाहिनीची उभारणी
अंतर्भूत आहे. या कामांमुळे अंत्यसंस्कार प्रक्रिया अधिक स्वच्छ, सुलभ व आधुनिक होणार आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रभागांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालयांची उभारणी सुरू आहे. या कामांसाठी २ कोटी रुपये मंजूर असून काही ठिकाणी कामे पूर्णत्वास जात आहेत. उत्कृष्ट प्रकाशयोजना, शांत अभ्यास व्यवस्था आणि आवश्यक ग्रंथसंपदा यात समाविष्ट केली जात आहे.
शहरातील सुरू असलेल्या आणि आगामी विकास प्रकल्पांना अधिक वेग देण्यासाठी अमळनेर तालुका शहर विकास आघाडीने नागरिकांना आवाहन केले आहे.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर आणि १८ प्रभागांतील ३५ उमेदवारांना विजयी करण्यासाठी त्यांच्या नावासमोरील ‘शिट्टी’ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


