Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Differently-Abled Employees : दिव्यांग कर्मचाऱ्यांना अनुकूलित वाहनांचे वाटप
    जळगाव

    Differently-Abled Employees : दिव्यांग कर्मचाऱ्यांना अनुकूलित वाहनांचे वाटप

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoDecember 3, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव परिमंडळात ‘ दिव्यांग दिन’ साजरा

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   

    महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात ३ डिसेंबर रोजी ‘जागतिक दिव्यांग दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त महावितरणमधील दिव्यांग अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांच्या हस्ते अनुकूलित वाहनांचे वितरण करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात प्रामुख्याने नंदुरबार मंडलातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

    बुधवारी झालेल्या विशेष कार्यक्रमास जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील, अधीक्षक अभियंता, पायाभूत आराखडा मनोज विश्वासे, मानव संसाधन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरुंगे, कार्यकारी अभियंता मानसी सुखटनकर, चेतन नंदनवार कार्यकारी अभियंता (प्रशासन) जळगाव मंडल, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) गणेश लिधूरे, अमित सोनवणे व.व्यवस्थापक (विवले), तन्वी मोरे व्यवस्थापक (मासं) तसेच दिव्यांग प्रहार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, इतर सर्व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    ‘जागतिक दिव्यांग दिन’ साजरा करण्यासोबतच दिव्यांगांबद्दल महावितरणची संवेदनशीलता व्यक्त करणारा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी महावितरणचे परिपत्रके वाटप करत मार्गदर्शन करुन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले.

    सन्मानित केलेल्या दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये विलास भटु पाटील, सहाय्यक अभियंता (नंदुरबार विभाग), विठ्ठल राजाराम सूर्यवंशी, प्रधान तंत्रज्ञ (नंदुरबार विभाग) निकलेश अनिल सोनार, वरिष्ठ तंत्रज्ञ (नंदुरबार विभाग), धनलाल दशरथ महाले, प्रधान यंत्रचालक (नंदुरबार विभाग), नंदलाल आसाराम महाजन, प्रधान तंत्रज्ञ (नंदुरबार विभाग), सुनील भगवान पाटील, वरिष्ठ तंत्रज्ञ (नंदुरबार विभाग), रतिलाल नथ्थु निकम, वरिष्ठ यंत्रचालक (शहादा विभाग) यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम महावितरणची आपल्या कर्मचाऱ्यांप्रति असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी दर्शवणारा ठरला. हा कार्यक्रम उपकार्यकारी अभियंता सुधीर म्हसने, मुख्य लिपीक चेतन तायडे, मुख्य लिपीक जे.डी. पाटील यांच्या सहकार्याने पार पडला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव महापालिकेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती निवडीची अंतिम तयारी

    February 25, 2026

    Jalgaon : महापौरांचा आवाहन स्थानिक महिला बचत गटांना खरेदीद्वारे पाठबळ द्या!

    February 25, 2026

    Jalgaon: जळगाव जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर; ५० कोटी ९७ लाखांचा विकासाचा दृष्टिकोन

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.