Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : जळगावमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
    जळगाव

    Jalgaon : जळगावमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

    saimatBy saimatFebruary 1, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: All-party tributes paid to late Deputy Chief Minister Ajitdada Pawar in Jalgaon
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावच्या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात अजितदाद्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

    साईमत/जळगाव  /प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सर्वपक्षीय व सर्वस्तरीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. राजकीय मतभेद विसरून विविध पक्षांचे नेते, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाट्यगृह परिसराला शोकाकुल वातावरणाने व्यापले.

    सभेत जिल्हाधिकारी रोहन घुगे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, उद्योगपती अशोक जैन, केड्राई महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष अनिश भाई शहा, आमदार अनिलदादा पाटील, आमदार राजू मामा भोळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच करीम सालार, संजय पवार, विष्णू भंगाळे, व्ही. डी. पाटील, पणन महासंघाचे रोहित निकम यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी व नागरिकांनी सहभाग नोंदवला.

    सभेदरम्यान वक्त्यांनी अजितदादा पवार यांच्या राजकीय वाटचालीवर प्रकाश टाकत त्यांच्या प्रशासकीय निर्णयक्षमतेची, विकासाभिमुख दृष्टिकोनाची आणि सामान्य लोकांशी असलेली बांधिलकीची स्मृती आठवली. कार्यकर्त्यांना दिलेले बळ, राज्याच्या विकासासाठी घेतलेले ठोस निर्णय आणि स्पष्टवक्तेपणा या गुणांमुळे त्यांनी जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले, असे अनेक उपस्थितांनी सांगितले.

    सभेअंतर्गत दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत नेत्यास आदरांजली अर्पण करण्यात आली. सामाजिक, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रातील उपस्थितांनी अजितदादा पवार यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त केली. या सभेमुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व स्तरांतील लोकांच्या मनात असलेला शोक आणि आदर एकत्रितपणे व्यक्त झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    Jalgaon : आधुनिक शेती, एआय तंत्रज्ञान आणि ग्रामीण संस्कृतीचा भव्य संगम

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.