युवा जिल्हाध्यक्षपदी कुणाल गालफाडे तर जिल्हाध्यक्षपदी अनिल टोंगे
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :
शहरातील नहाटा महाविद्यालयाजवळील संत शिरोमणी संत सेना महाराज सभागृहात अखिल भारतीय जिवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी दिनेश महाले होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून युवा प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगारे, सुधाकर सनान्से, प्रदेश संघटक सुधीर महाले, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष समाधान निकम, भुसावळचे अध्यक्ष संजय बोरसे, युवा प्रदेश सचिव डॉ.नरेंद्र महाले, जिल्हाध्यक्ष गणेश सेठी उपस्थित होते. मेळाव्यात नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यात युवक पूर्व विभागाच्या युवक जिल्हाध्यक्षपदी कुणाल गालफाडे तर पूर्व विभागीय जिल्हाध्यक्ष अनिल टोंगे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश सेठी, उत्तर महाराष्ट्र तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश ठाकरे, जिल्हा मार्गदर्शक संजय बोरसे तर विनोद आंबेकर यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.
मेळाव्यात विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर समाज विकासाच्या योजनांची माहितीही देण्यात आली. तसेच अध्यक्षांनी अध्यक्षीय भाषणात समाज संघटनासाठी तरुणांनी पुढे यावे, याविषयावर चर्चा केली तर देविदास फुलपगारे यांनी शैक्षणिक विकास समाजाचा आधारस्तंभ असल्याचे सांगितले. मेळाव्याला नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी विनोद आंबेकर, कैलास वारूळकर, रवी अहिरकर, हेमंत सनान्से, रामदास बाणाईत, बॉबी सनान्से, अमोल निकम, दिलीप लोंढे, संदीप पवार, दीपक बोरणारे, संजय गालफाडे, अखिल भारतीय जिवासेनेचे पदाधिकारी, सदस्य यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक संजय बोरसे, सुत्रसंचालन डॉ.नरेंद्र महाले तर आभार कुणाल गालफाडे यांनी मानले.