साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी (आमीन पिंजारी)
कर्तव्य दक्ष वर्ग एक चे अधिकारी हे जनतेच्या सेवे करीता २४ तास सेवेत असतात. मात्र भडगाव येथिल गट विकास अधिकारी यांनी ऑन ड्युटी शासकीय वाहनाने(MH19M0742) कजगावं च्या हॉटेल मधे येऊन भर दिवसा दारू पार्टी केली. आधीच भडगाव पंचायत समितीवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे. अशात हा ऑन ड्युटी दारू पार्टी चा प्रकार म्हणजे एखादे प्रकरण रफादफा तर होत नाहीं ना याची शंका आहे. सोबतच वर्ग एक चे ऑन ड्युटी वरिष्ठ अधिकारी ज्या लोकांसोबत दारू पार्टी करत बसले होते ते लोक कोण हा मोठा प्रश्न पडला आहे.
नुकताच मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशियाना यांचा भडगाव डौरा झाला. हा डौरा शांततेत झाल्याने नंतर सर्व काहीं अलबेल असल्यासारखे अधिकारी बिनधास्त पार्टी करत असल्याच चित्र आज दी १९ रोजी दुपारी कजगाव च्या बियर बार मध्ये दिसले. मात्र तालुका कार्यालयांत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी यांना वेळ नसतो. ग्रामीण भागातून सातत्याने लोक पंचायत समितीत फेऱ्या मारत असतात. त्यांचे हाल होतात. मात्र ऑन ड्युटी पार्टी म्हणजे सरसकट सर्व नियम खुंटीला टांगून ठेवले आहे असा प्रकार आहे.
या अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा किती वचक आहे , हे दारू पार्टीतून समोर आले आहे.
जनतेची सेवा कार्य सोडून भर दिवसा दारू पार्टी करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशियाना हे काय कार्यवाही करतात. की बगल देतात हे पाहणे ओस्तुक्याचे ठरणार आहे.