साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित माधवराव चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजकपदी निवड केली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील रांजणगावचे येथील ते मूळ रहिवासी आहेत. तसेच ते जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माध्यम प्रभारी आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीचे पत्र देऊन कौतुक केले आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते माधव भंडारी, सरचिटणीस विजय चौधरी, सरचिटणीस माधवी नाईक, वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित गोपछडे उपस्थित होते.
या नियुक्तीबद्दल ना.गिरीश महाजन, खा.उन्मेष पाटील, खा.रक्षा खडसे, आ.सुरेश भोळे (राजु मामा), आ.संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, ह.भ.प.ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, उज्ज्वला बेंडाळे तसेच प्रदेश पदाधिकारी नेते, कार्यकर्त्यांनी कौतुक केले आहे.