साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी
भगवंत पांडुरंगाच्या दरबारी भेट घेऊन आलेल्या संत मुक्ताई पालखी सोहळ्याच्या साक्षीदार असलेल्या आषाढी वारीतील वारकरी आणि मुक्ताई ची पालखी चे आज शहरात जल्लोशात स्वागत करण्यात आले.तब्बल ९५ दिंड्यांनी मुक्ताईनगर मध्ये आगमन केले होते
पंचक्रोशीतील नागरिकांनी मनोभावे सेवा करून आई मुक्ताईच्या गजरामध्ये तल्लीन होऊन हजेरी लावत संत श्रद्धेचा मन मुराद आनंद घेतला.
सकाळी १० वाजता पासून पालखी सोहळ्याचे प्रस्थान नवे मुक्ताई मंदिरावरून मूळ स्थानी श्रीक्षेत्र कोथळी कडे झाले प्रसंगी पालखी पूजन करण्यात आले प्रसंगी संस्थान चे अध्यक्ष ऍड रवींद्र पाटील (Ravindra Patil) , विश्वस्त पंजाबराव पाटील संदीप पाटील,ऍड रोहिणी खडसे (Adv.Rohini Khadse), निवृत्ती पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी तहसीलदार आदी उपस्थित होते. या नंतर पालखी सोहळा जुने मुक्ताई मंदिराकडे मार्गस्थ झाला पालखी सोहळा अतिशय थाटात निघाला असून मुक्ताईनगर प्रवेश द्वारावर पालखी वर पुष्पवृष्टी करण्यात आली. शहर प्रवेश प्रसंगी प्रभारी नगराध्य मनीषा पाटील प्रवीण पाटील , नगरसेवक आणि नगरपंचायत कर्मचार्यानी स्वागत केले.पालखी मार्गावर पालखीच्या आगमनानिमित्त नवे मुक्ताई मंदिर ते जुने मुक्ताई मंदिर मार्गावर शहरवासीयांतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. भगवी पताका केळीचे खांब, स्वागत फलके, चौकाचौकात वारकरी भाविकांच्या चहा पान, फराळाची सुविधा पुष्पवृष्टी संत आणि वारकऱ्यांच्या सेवेचा मनमुराद आनंद देणारी सेवा सेवेकर्यांनी दिली. . पालखी मार्गावर अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांतर्फे व्यापारी वर्ग यांच्यातर्फे स्वागतपर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते तर पालखी मार्गावर श्री स्वामी समर्थ केंद्र जुनेगाव तर्फे सेवेकरी महिला व मुलींनी आकर्षक रांगोळ्या काढून सेवा दिली.
तसेच श्री स्वामी समर्थ सेवेकर्यांनी शंभर लिटर दुधाचा चहा संपूर्ण वारकऱ्यांना पुरेल एवढी चहा चे आयोजन देखील केले होते
पालखी उत्सव समितीचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम वंजारी, सदाभाऊ पाटील, विशाल सापधरे, उमेश राणे, निवृत्ती पाटील, श्रीकांत पाटील, पवन सदावर्ते आदी नागरिकांनी सहकार्य करत पालखीची शोभा वाढवली असून सिव्हिल सोसायटी यांचा खारीचा वाटा पालखी नियोजनाला लाभलेला आहे महाप्रसाद बनवण्यासाठी कोथळी येथील ग्रामस्थ व सालबर्डी येथील ग्रामस्थ यांचं मोलाचं योगदान लाभलं असून महाप्रसाद हा खूप चविष्ट असून भाविकांनी महाप्रसाद बनवणाऱ्यांचे स्वयंपाकी यांचे आभार देखील व्यक्त केले
ताटी उघडा ज्ञानेश्वरा आई मुक्ताई चे अभंग असून त्याचप्रमाणे देखील सजीव देखावा साकारण्यात आला असून ज्ञानेश्वर दादा ताटी मध्ये बसलेले होते व आई मुक्ताई त्यांना ताटी उघडण्यासाठी विनवणी करत असा सजीव देखावा करण्यात आला असून अश्या प्रकारचे विविध सजीव देखावे करण्यात आले व पालखी सोहळा चे जल्लोष्यात स्वागतच आनंद रंग दिवसभर उमटून दिसला
वारकरी दिंडी स्पर्धा निकाल
बालगटप्रथम
मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था कोथळी
बालगटद्वितीय
मुक्ताई कन्याभजनी मंडळ म्हैसवाडी तालुका मलकापूर
तृतीयक्रमांक
जिजाऊ कन्या भजनी मंडळ अनुराबाद ता.मलकापूर
महिलागट प्रथम
वियोगी महिला भजनी मंडळ पळसोडा तालुका नांदुरा
महिलागट
द्वितीय क्रमांक
जय गजानन महिला भजनी मंडळ देवधाबा तालुका मलकापूर
तृतीय क्रमांक
मुक्ताई महिला भजनी मंडळ पिंपरी आकाराऊत
पुरुष गट
प्रथम क्रमांक
अहिल्यादेवी हरिपाठ मंडळ मुक्ताईनगर
पुरूषगट द्वितीय क्रमांक
सद्गुरु आवली बाबा भजनी मंडळ सोनाळा
तृतीय क्रमांक
हनुमान भजनी मंडळ लोणी जामनेर