जामनेरात बुध्दीजीवी प्रेरणा संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी प्रजाजनांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्याची आपल्या राजवटीत काटेकोरपणे अंमलबजावणी केली.शिवाय धार्मिकतेला जपुन बारा ज्योतीर्लिगांसह अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार स्वखर्चाने केला. त्यांनी सर्व समाजासाठी अनेक कार्य केल्याचे प्रतिपादन जळगाव येथील माजी नगरसेविका ॲड.शुचिता हाडा यांनी केले. शहरातील एकलव्य माध्यमिक शाळा येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अहिल्याबाई होळकरांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रेरणावंत बुद्धिजीवी प्रेरणा संवाद कार्यक्रमात भाजपाचे जळगाव (पूर्व) जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर, ॲड.शिवाजी सोनार, संजय गरुड, गोविंद अग्रवाल, अजय भोळे, नवलसिंग पाटील, आतिश झाल्टे, अनंत कुलकर्णी, हरलाल कोळी, प्रदीप लोढा, रवींद्र झाल्टे, मयूर पाटील, कमलाकर पाटील, प्रा शरद पाटील, डॉ.प्रशांत भोंडे, डॉ.संजीव पाटील, अमित देशमुख, राजधर पांढरे, अमोल देशमुख, योगेश मोते, दीपक पाटील, सुहास पाटील, कैलास पालवे, सुभाष पवार, हरीश पर्वते, प्रमोद सोनवणे यांच्यासह डॉक्टर्स, प्राध्यापक, इंजिनियर्स, प्रमुख पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नवलसिंग पाटील, गोविंद अग्रवाल आदींनी विचार मांडले. सुत्रसंचलन रवींद्र झाल्टे तर मयूर पाटील यांनी आभार मानले.