दारुबंदीसाठी त्रस्त महिलांचा आक्रोश मोर्चा

0
10

साईमत/ न्यूज नेटवर्क/ सावदा, ता.रावेर :

रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तासखेड्यात कायद्याचा कोणताच धाक न बाळगता राजरोसपणे अवैधरित्या दररोज होणारी दारु विक्रीच्या त्रासाला कंटाळून व यामुळे त्यांच्या होणाऱ्या संसाराच्या राख रांगोळीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी एकत्र येऊन गावात कायमची दारुबंदी करण्यात यावी असा पवित्रा घेत थेट तासखेडा ग्रामपंचायत सदस्य विनोद कोळी यांना सोबत घेऊन व त्यांच्या मध्यस्थीने ४ जुलै रोजी सावदा पोलीस ठाण्यात महिलांनी आक्रोश मार्चा काढून आमच्या गावात कायमची दारुबंदी करण्यात यावी, अशी रास्त मागणी नूतन सहा.पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनावर दिव्या कोळी, सुपडाबाई कोळी, आशा गोसावी, कविता कुंभार, जिजाबाई पाटील, शारदा पाटील, रेखा विनोद तायडे, भावना पाटील, माया पाटील, जनाबाई पाटील, चंदा कोळी, संजना कोळी, रेखा बाम्हंदे, योगीता कोळी, संजीवनी कोळी, शोभा कोळी, ललीता कोळी, सोनाली तायडे, जागृती कोळी, निर्मला कोळी, शोभाबाई पाटील, माधूरी बाम्हंदे, नंदाबाई पाटील, रेतना इंगळे,करीष्मा इंगळे, कविता बाम्हदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

नूतन सपोनि विशाल पाटील त्रस्त महिलांना न्याय देतील का?

दोन दिवसांपूर्वी सावदा पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहा.पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या समक्ष अवैध दारू विक्रीला कंटाळून महिला आक्रोश करत आम्हाला न्याय द्या, आमच्या मुलाबाळांना सुखाचा घास खाऊ द्या, दारूमुळे आमचे कुटूंब उघडल्यावर पडले असून आमच्या संसाराची राख रांगोळी होण्यापासून वाचवा, असा आक्रोश करत अश्रू अनावर झालेल्या महिलांनी समस्या मांडल्या. त्याची दखल घेऊन नूतन सपोनि विशाल पाटील हे कायम स्वरूपी दारू बंदी करतील का? या महिलांना न्याय मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here