साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
गणरायानंतर आता खान्देशात भुुलाबाईच्या उत्सवाला उधाण आले आहे. त्यात महिलावर्ग रंगून जातात. गणपती विसर्जनानंतर पाचोरा परिसरात ग्रामदैवत भुलाबाईची ठिकठिकाणी स्थापना करण्यात येत होती. आता पुन्हा महिलांनी भुलाबाई मंडळाची निर्मिती करून चौकाचौकात भुलाबाईच्या मूर्तीची विधिवत स्थापना केली पाहिजे. पाचोरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भुलाबाईची मूर्ती
१०० रुपयात विक्रीसाठी आली आहे. शहरात प्रत्येक भागात महिलांनी एकत्र येऊन यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला पाहिजे. रोज सकाळी भुलाबाईची आरती, विविध मनोरंजक खेळ, गाणी, प्रसाद वाटप यात रंगून जाऊन त्यात रात्री उशिरापर्यंत महिला व मुलींचा लक्षणीय सहभाग घेत या खेळातून सांघिक वृत्ती वाढत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना चांगला विरंगुळा मिळून त्यांच्यावरील कामाच्या बोजातून त्यांना निखळ आनंदाची अनुभूती मिळते. महिला, तरुणी आणि लहान मुलींसाठी मनोरंजक खेळ, स्पर्धांचे आयोजन कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.