बोरखेडे बु. शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील बोरखेडा बु.पिराचे येथील माध्यमिक विद्यालयाच्या २००७ च्या दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. हा मेळावा बोरखेडा जवळील ऋषीपांथा येथील निसर्गरम्य परिसरात घेण्यात आला. प्राथमिक शाळा ते माध्यमिक विद्यालयात २००७ पर्यंतचे माजी विद्यार्थी जवळपास १७ वर्षांनंतर प्रथमच मेळाव्यात एकत्र सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी श्री. भवर, श्री. ठाकुर होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री शिक्षकवर्ग श्री.बागुल, श्री.महाजन, शालिग्राम पाटील, रेखा पाटील, विजय चौधरी, श्री. सोनवणे,श्री. गवळी, बी.जे.पाटील, रमेश सोनवणे, श्री.पवार आदी उपस्थित होते. तसेच रायबा आबा, सुनील तात्या यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता प्रतिमा पूजन व दीप प्रज्ज्वलनाने झाली.
यावेळी शितल पाटील, पूनम पाटील, विद्या पाटील यांनी मान्यवरांसाठी स्वागतगीत सादर केले. यावेळी सर्व मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी घडविलेले सर्व विद्यार्थी आज समाजातील सर्व क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करुन नावलौकिक मिळवत आहेत. त्यांच्या नावलौकिकासोबत शाळेचे व शिक्षकांचे नावही गौरवान्वित करत आहेत. याबद्दल समाधान व्यक्त करुन कौतुक केले.
यांची लाभली उपस्थिती
याप्रसंगी माजी विद्यार्थी डॉ.दिनेश सोनार, भाऊसाहेब पाटील, सचिन बी. पाटील, संदीप पाटील, सचिन पी. पाटील, सागर भालेराव, अमोल पाटील, राहुल पाटील, महेश पाटील, भुपेंद्र पाटील, नानासाहेब पाटील, भाऊसाहेब पाटील, समाधान पाटील, तुळशीराम चित्ते, विनोद पाटील, दीपक पाटील, राहुल बी.पाटील, अत्तर शेख, मनोज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राकेश पाटील, कासम शेख, मनोज पाटील, ज्ञानेश्वर ए. पाटील, बशीर शेख, रावसाहेब पाटील, शरद पिलोरे, ॲड.करुणा सोनवणे, शितल पाटील, पूनम पाटील, विद्या पाटील, जयश्री पाटील, कविता पाटील, राजश्री पाटील, दीपाली पाटील, महानंदा पाटील, इंदिरा पाटील यांच्यासह सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. दिनेश सोनार तर सुत्रसंचालन ॲड. करुणा सोनवणे यांनी केले.