साईमत/ न्यूज नेटवर्क/जामनेर :
तालुक्यातील केकनिंभोरा येथील स्व. राजमल शंकर पाटील दूध उत्पादक सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. संस्थेवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या ४५ वर्षांपासून ही संस्था काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणित नाना पाटील यांच्या अधिपत्याखाली होती. मात्र, यावेळी ना. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाप्रणित डॉ. प्रशांत भोंडे यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलने प्रस्थापित राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी पॅनलचा १६ विरुद्ध १ असा दणदणीत पराभव केला आहे.
यावेळी झालेल्या नवनियुक्त सदस्यांच्या बैठकीत चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली. त्यात चेअरमनपदी आशाबाई ज्ञानेश्वर थाटे तर व्हाईस चेअरमनपदी कमलबाई भगीरथ पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनियुक्त सदस्यांसह चेअरमन, व्हॉईस चेअरमन यांचे ना. गिरीश महाजन, डॉ. प्रशांत भोंडे यांनी कौतुक केले आहे.
भाजपा प्रणित डॉ. प्रशांत भोंडे यांच्या परिवर्तन पॅनलच्या १७ उमेदवारांपैकी १६ उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्ये संभाजी दौलत शिंदे, कैलास देवराम शिंदे, विश्वास कडू वाढे, सुमित्रा सोपान भोंडे, ज्ञानेश्वर म्हस्के, समाधान पाटील, दिलीप हिरालाल पाटील, किशोर निकम, विमलबाई पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, विष्णू नारायण शिंदे, विजय सुनील पाटील, अशोक रामलाल शिंदे, सुनीता वासुदेव शिंदे, कमलबाई भगीरथ पाटील, आशाबाई ज्ञानेश्वर थाटे यांचा समावेश आहे. विरोधी शेतकरी पॅनलचे एकमेव उमेदवार जिल्हा बँकेचे संचालक नाना राजमल पाटील निवडून आले आहेत.