Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»केसीईच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा उत्साहात
    जळगाव

    केसीईच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा उत्साहात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 19, 2024Updated:August 19, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    २२ शाळांमधील ५९५ विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी:

    येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाच्यावतीने जळगाव शहरातील शालेय स्तरीय विद्यार्थ्यांसाठी के.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या संकल्पनेतून श्रावण पौर्णिमेदिनी सर्वत्र साजरा केल्या जाणाऱ्या विश्व संस्कृत दिनानिमित्त आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत शहरातील २२ शाळांमधील आठवी, नववी, दहावीतील ५९५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच ५० संघ व्यवस्थापक उपस्थित होते.

    सकाळच्या प्रथम सत्रात के.सी.ई.सोसायटीचे सहसचिव ॲड.प्रवीणचंद्र जंगले यांच्या हस्ते यज्ञ प्रज्वलित करीत शंखनाद व मंत्रोच्चारात स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे होते. यावेळी ॲड. प्रवीणचंद्र जंगले यांनी मनोगतातून संस्कृत भाषेच्या प्रचार, प्रसार व विकासासाठी अशा स्पर्धांची नितांत गरज असल्याचे सांगत अण्णासाहेब डॉ.जी.डी. बेंडाळे प्रतिष्ठानच्यावतीने माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शहरस्तरीय गीता पठण स्पर्धा आयोजित केली जाते, असे प्रतिपादन केले. तसेच आद्य शंकराचार्य यांचे स्पर्धेला दिलेले नाव अत्यंत समर्पक असल्याचे सांगितले.

    द्वितीय सत्रात आयोजित केलेल्या स्पर्धेत अत्यंत उत्साहात स्तोत्र पठण करीत संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला.

    स्पर्धेच्या तिन्ही गटातील विजेते संघ

    स्पर्धेत आठवीच्या गटातून श्रीमती एस.एल.चौधरी शाळेने प्रथम तर ब. गो. शानबाग विद्यालयाने द्वितीय आणि नंदिनीबाई मुलींचे विद्यालयाने तृतीय क्रमांक तर अ.वा.अत्रे इंग्लिश मीडियम स्कुल व ओरियन सी.बी.एस.ई.स्कुलने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. नववीच्या गटातून ओरियन सी. बी.एस.ई. स्कुल प्रथम, प.न.लुंकड द्वितीय, न्यू इंग्लिश मीडियम स्कुल तृतीय तर नंदिनीबाई मुलींचे विद्यालय व अ.वा.अत्रे इंग्लिश मीडियम स्कुल उत्तेजनार्थ बक्षीसाचे मानकरी ठरले. दहावीच्या गटातून ब.गो.शानबाग विद्यालय प्रथम, ओरियन सी.बी.एस.ई. द्वितीय, प.न.लुंकड तृतीय, सु.ज.वाणी भगीरथ स्कुल, नंदिनीबाई मुलींचे विद्यालय यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.

    स्वामी विवेकानंदाच्या मूर्तीसह प्रमाणपत्र देऊन विजेते सन्मानित

    पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आयुर्वेदाचार्य डॉ. केतकी कुलकर्णी यांच्या हस्ते स्पर्धेच्या विजेत्या प्रत्येक गटाला, वर्गाला प्रथम बक्षीस ७०१ रुपये, द्वितीय बक्षीस ५०१ रुपये, तृतीय बक्षीस ३०१ रुपये, आणि उत्तेजनार्थ क्रमांकाचे प्रत्येकी २०१ रुपयाचे बक्षीस, स्वामी विवेकानंद यांची मूर्ती व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉ. केतकी कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात संस्कृत भाषेचे महत्त्व विशद केले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.करुणा सपकाळे होते. यावेळी मंचावर पर्यवेक्षक प्रा.आर.बी. ठाकरे, समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, प्रा.उमेश पाटील, संस्कृत शिक्षक प्रा.अर्जुनशास्त्री मेटे आदी उपस्थित होते.

    यांनी घेतले परिश्रम

    स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ. भाग्यश्री भलवतकर, प्रा.डॉ अखिलेश शर्मा, प्रा.कपील शिंगाणे, प्रा.मयुरी हरिमकर, प्रा.प्रीती शुक्ल, प्रा.सुप्रिया देशपांडे यांनी केले. यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. बक्षिसांचे वाचन प्रा. छाया चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश सूर्यवंशी तर आभार प्रा.आर. बी.ठाकरे यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.