ॲड. ऐश्वर्या पाटील यांच्यामुळे चोरीस गेलेला मोबाईल युवकाला परत मिळाला

0
4

अडीच महिन्यानंतर केलेल्या प्रयत्नांना मिळाले यश

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

येथील नवीन बसस्थानकावरून गेल्या २२ जुलै २०२४ रोजी ओम संजय पाटील या युवकाचा सॅमसंग गॅलक्सी ‘एस२३एफई’ हा मोबाईल बसमध्ये चढत असतांना चोरीस गेला होता. त्यानंतर त्याने लागलीच जळगाव पोलीस स्टेशन तसेच ऑनलाईनचे ‘सीईआयआर’ पोर्टलवर संबंधित मोबाईल गहाळ झाल्याची तक्रारही नोंदविली होती. शेवटचे लोकेशन नाशिक येथे येत असूनही तसे पोलिसांना कळवले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले आणि दोन महिने होऊनही कोणताही तपास किंवा तशी पुढे कार्यवाही पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी केलेली नव्हती. अखेर जळगावातील ॲड. ऐश्वर्या पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे चोरीस गेलेला मोबाईल युवकाला मिळाला आहे.

संबंधित मोबाईल ट्रेस झाल्याचे मेसेज वारंवार ओमला येत होते. तरीही जिल्हा पेठ पोलीस स्टेशन त्यावर काहीच कार्यवाही करण्यास तयार नव्हते. उडवाउडवीची उत्तरे देऊन ओमला माघारी पाठवून देत होते. दोन महिने झाल्यानंतर प्रयत्नांना कंटाळून ओमने ॲड. ऐश्वर्या पाटील यांची मदत घेण्याचे ठरविले. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला भेट देत संपूर्ण माहिती समजून घेत पुढे कार्यवाही करण्याची विनंती केली होती. ॲड.ऐश्वर्या आणि ओम यांचे दिलेल्या नंबरवरून शोध घेणे सुरूच होते. दिलेला मोबाईल नंबर हा स्विच ऑफ येत होता. मात्र, सोशल मीडियाचा योग्य उपयोग करून नाव आणि इतर माहिती गोळा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.

अखेर प्रयत्नांना मिळाले यश

संबंधित मोबाईल नंबरवरून फोन पे वर संपूर्ण नाव येत होते. तेच नाव सोशल मीडियावर टाकले. तेव्हा योग्य ती माहिती तसेच त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचे मोबाईल नंबर शोधण्यास यश आले. त्यांच्याशी संपर्क करत कायद्याचा आणि ओळखीचा धाक दाखवत तुम्ही व तुमचे कुटुंब कसे धोक्यात येईल, हे सांगत त्यांच्याकडे मोबाईल असल्याची माहिती काढून घेतली. फक्त तीन ते चार तासांच्या प्रयत्नात मोबाईल ताब्यात घेतला. ॲड. ऐश्वर्या पाटील यांनी सर्व कसोशीने काटेकोर केलेल्या प्रयत्नांमुळे तब्बल अडीच महिन्यांपासून हरविलेला मोबाईल ओम पाटीलला मिळाला असल्याचे सांगण्यात आले.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here