रामानंद नगर पोलिसात अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील रामानंद नगरातील चर्च समोर अज्ञात कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील प्रौढ गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी, २५ मे रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी २६ मे रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजपूत कॉलनीतील रहिवासी दिवानसिंग पाटील हे २५ मे रोजी दुपारी ४ वाजता रामानंद नगर येथील चर्च परिसरात दुचाकीने (क्र.एमएच १९ इएर्फ १५७३) जात होते. तेव्हा मागून येणारी कारने (क्र.एमएच १९, ९०७९) जोरदार धडक दिली. धडकेत दिवानसिंह गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.
याप्रकरणी त्यांचा मुलगा चेतन राजपूत याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. शरद वंजारी करीत आहे.
