साईमत, अडावद, ता.चोपडा ः वार्ताहर
मोहंमद शफी शेख बाबू वडाला, मुंबई यांच्यावतीने त्यांच्या धर्मपत्नी स्व. ‘बहार यजदानी’ यांच्या स्मरणार्थ अडावद येथील मदरसा काफियतुल उलूम याठिकाणी ११ मे रोजी मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्यात आर्थिक परिस्थिती नसलेल्या कुटुंबातील ११ जोडप्यांचा ‘शुभमंगल’ पार पडला. सोहळ्यात जवळपास तीन हजारपर्यंत समाजबांधवांनी तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली.
मोहम्मद शफी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात सर्व जोडप्यांना प्लंग, गादी, गोदरेज कपाट तसेच जवळपास सर्वच संसारोपयोगी साहित्य, नवदाम्पत्यांचा प्रत्येकी दोन, दोनशे पाहुण्यांना बऱ्हाणपूरी दाळभाताची मेजवानी देण्यात आली.विवाह सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी मोहंमद शफी शेख यांच्या मित्रपरिवारातील सदस्यांनी तसेच गावातील तरुणांनी शिस्तबद्ध यंत्रणा उभारली होती. वधुरांच्या थांबण्याची व्यवस्था, जेवण पाण्याची व्यवस्था, लग्न कार्यासाठी उभारलेला भव्य शामियाना, लग्न सोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था, पार्किंगची सुविधा आदी बारीकसारीक गोष्टी अतिशय चोखपणे पार पाडल्या.
विवाह सोहळ्यात वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी जिल्ह्याभरातील असंख्य मान्यवरांची उपस्थित होती. त्यात प्रामुख्याने मोहम्मद शफी शेख त्यांच्या परिवातील सदस्य रफिक शेख, आसिफ पटेल अंधेरी, डॉ.सोबिया पटेल यांची विशेष उपस्थिती होती. तसेच सईद खान इब्राहिम खान, अडावद नगरीचे लोकनियुक्त सरपंच बबनखा तडवी, माजी सरपंच कबिरोद्दीन शेख, गायत्री सोनवणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जळगाव, सागर साळुंखे जळगाव, कादरी फाउंडेशनचे अध्यक्ष कादरी, डॉ.रागिब, जळगाव, मन्यार बिरादरीचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख, नायब तहसीलदार सय्यद, चोपडा, अब्दुल रज्जाक शेख, जहिरोद्दीन शेख हाशम, मौलवी शेख वाजीब, फारूक मन्यार, वसीम शेख, खालिद शेख, शकील मेंबर, जावेद मेंबर, कालु मेंबर, इम्रान मजीद खान, मझहर खान, नूरमोहम्मद आदी मान्यवर उपस्थित होते.
अडावद येथील सईद खान इब्राहिम खान यांचे मोहंमद शफी शेख हे भाचे आहेत. आपणही समाजाचे देणे लागतो या उदात्त भावनेतून ते अशा प्रकारचे उपक्रम राबवित असतात. आर्थिक परिस्थिती नसलेल्या ५६ जोडप्यांचे त्यांनी स्वखर्चाने यापूर्वी विवाह करून दिलेले आहे. त्यांचा समाजसेवेच्या माध्यमातून सुरू असलेला विवाह सोहळा यज्ञ कित्येक वर्षांपासून सुरू आहे. त्यांचा हा संकल्प खूपच पवित्र आहे. तो निरंतर सुरु रहावा, गरिबांच्या मुला-मुलींचे एक हातचे दोन हात व्हावे, यासाठी अल्लाहशी त्यांना निरोगी दीर्घायुष्याची प्रार्थना करूया.
मोहंमद शफी यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ राबविलेला सामूहिक विवाह सोहळा समाजाला दिशा देणारा आणि गरिबांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा सोहळा ठरला आहे. त्यामुळे मोहंमद शफी शेख यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. समाजातील आर्थिक परिस्थिती नसलेल्या लोकांच्या मुला-मुलींसाठी असे सोहळे आयोजित केले तर गरजुंना त्याचा निश्चित लाभ होईल.
यशस्वीतेसाठी शेख शब्बीर, अल्ताफ शेख साहेब, मदरसा काफियतुल उलूमचे प्राचार्य खिलाफत अली, नासिर, अलाउद्दीन मौलाना यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.